शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:45 IST

नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.

नवी दिल्ली, दि. 18 - नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.  इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गरबामध्ये अनेकदा हिंदू नसलेली लोकं येतात व ते हिंदू मुलींनी स्वतःकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात, असे समितीचे म्हणणे आहे. एकूणच गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळू नये, यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्याची बाब संस्थेचं अध्यक्ष कैलास बेगवानी यांनी मान्य केली आहे. भोपळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत संस्थेनं गरबामध्ये आधार कार्ड सक्ती करण्यात यावी, अशी   मागणी केली आहे.  

बेगवानी यांनी समितीच्या मागणीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ''निवडणूक ओळख पत्र किंवा अन्य कागदपत्रांप्रमाणे बनावट आधार कार्ड तयार करणे सोपे नाही. गरबामध्ये प्रवेशावेळी आधार कार्ड दाखवले तर त्याच्या ओळखीबाबत कोणतीही शंका उपस्थित होणार नाही''. ''उत्सवानंतर हिंदू मुलींचे इतर धर्मातील लोकांकडून शोषण झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. हिंदू नसलेली लोकं उत्सवादरम्यान हिंदू मुलींशी मैत्री करतात. त्यांना स्वतःकडे आकर्षित करतात'', असेही त्यांनी सांगितले.हिंदू उत्सव समितीनं आपली ही मागणी जिल्हा प्रशासनाद्वारे बोलवण्यात आलेल्या  शांतता बैठकीत मांडली. मात्र, जिल्हा प्रशासननं हिंदू उत्सव समितीला याबाबत कोणतेही आश्वासन अद्यापपर्यंत दिलेले नाही. या समितीत 6 हजार सदस्य आहेत. काही दशकांपूर्वी ही समिती होळी आणि दसरा यांसारख्या उत्सव साजरे करत होती, मात्र गरबाचे कधीही आयोजन केलेले नव्हते. दरम्यान, बैठकीत समितीतर्फे आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वात मांस विक्री आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या मागण्यांचे निवेदनही समितीने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेश मूर्तीची उंची 9 फुटांपेक्षा जास्त नको, अशी मागणीही केली होती. पण नियोजन समितीने ती फेटाळली. जी मंडळं ऊंच मूर्ती बनवत आहेत त्यांनी यामुळे कोणतेही दुर्घटना घडल्यास त्यास आयोजक जबाबदार असतील असा बॉन्ड द्यावा, अशी मागणी हिंदू उत्सव समितीनं केली होती.