शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी ED कडून राहुल गांधींची १० तास चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 00:06 IST

Rahul Gandhi ED : नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी तिसऱ्या दिवशीही राहुल गांधींची चौकशी होणार.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसूली संचलनालयानं सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सलग दहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

ईडीनं सलग तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयनं दिली आहे. दुसऱ्या दिवशीही त्यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनं करण्यात आली. तसंच अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. राहुल गांधी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही होत्या. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सकाळी ११.३० वाजता राहुल गांधींची चौकशी सुरू करण्यात आली. सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी बाहेर आले आणि तासाभरानंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारीदेखील ईडीनं त्यांनी चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. दरम्यान, पक्षाचे संघटन महासचिव केसी वेणुगापाल यांनी एक व्हिडीओ जारी केला होता. “नरेंद्र मोदी सरकार तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत आहे. काँग्रेसच्या नेत्यांविरोधात सुडाचं राजकणार करत कारवाई केली जात आहे. काँग्रेस सत्यासोबत आहे आणि आम्ही घाबरणार नाही,” असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPriyanka Gandhiप्रियंका गांधी