शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराचा मोफत मांस देण्यास नकार; माथेफिरुने संतापून दुकानाबाहेर फेकला कुजलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:14 IST

तमिळनाडूमध्ये एका माथेफिरुने स्मशानातील मृतदेह रस्त्यावरील एका दुकानासमोर आणून टाकल्याचा प्रकार समोर आला.

Shocking News: तमिळनाडूमध्ये मोफत मांस न दिल्याने एका व्यक्तीने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला.  फुकटात मांस न मिळाल्याने एका व्यक्तीने चक्क मृतदेहच आणून दुकानासमोर फेकून दिला. हा सगळा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावून गेले. या घटनेनंतर ती व्यक्ती तिथून पळून गेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. धक्कादायक बाब म्हणजे त्या माथेफिरुने तो मृतदेह स्मशानातून आणला होती आणि तो कुजलेला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तो स्मशानातील कर्मचारी असल्याचे समोर आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तामिळनाडूच्या चेट्टीपट्टी भागात हा सगळा प्रकार घडला. कुमार असे आरोपीचे नाव असून तो स्मशानभूमीत काम करतो. पोलिसांना चौकशीत आढळलं की आरोपी कुमार दुकानदाराकडे मोफत मांस मागत होता. मात्र दुकानदार मणियारसनने त्याला फुकट मास देण्यास नकार दिला तेव्हा कुमारला खूप राग आला आणि त्याने बदला घेण्याचे ठरवले. बदला घेण्यासाठी कुमारने जी पद्धत वापरली ती अतिशय धक्कादायक होती. कुमारने कुजलेला मृतदेह दुकानासमोर फेकला.

त्यानंतर आरोपी कुमारने मणियारसनला या भागात काम करू देणार नाही, अशी धमकीही दिली. त्यानंतर आरोपी कुमार तिथून पळून गेला. कुमार हा स्मशानभूमीत काम करतो. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृतदेह पाहून दुकानदाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन स्मशानभूमीत परत पाठवला. मृतदेह फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

मटण खूप महाग झाले असून ते फुकट देऊ शकत नाही, असे मणियारासनने कुमारला सांगितले होते. मणियारासन असं म्हटल राग येऊन कुमार दुकानातून निघून गेला. पण काही काळानंतर तो एवढं भयंकर पाऊल उचलेल याची कुणालाही कल्पना नव्हती.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारी