शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबलीमधील या सौंदर्यवान अभिनेत्रीवर चाहत्यानेच फेकली चप्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:43 IST

ज्याने हे कृत्य केले तो तमन्नाचा चाहता असून तमन्नाच्या चित्रपट निवडीवर तो संतापला होता. आपला राग व्यक्त करण्यासाठी त्याने अशा प्रकारचे कृत्य केले.

ठळक मुद्दे तमन्नाच्या दिशेने चप्पल फेकल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हैदराबाद - दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बाहुबली फेम तमन्ना भाटियाला चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाला गेलेली असताना ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी 31 वर्षाच्या तरुणाला अटक केली असून तो बी-टेकमध्ये पदवीधर आहे. आरोपीने तमन्नाच्या दिशेने फेकलेली चप्पल तिथे उभ्या असलेल्या ज्वेलरी शॉपच्या कर्मचा-याला जाऊन लागली. 

ज्याने हे कृत्य केले तो तमन्नाचा चाहता असून तमन्नाच्या चित्रपट निवडीवर तो संतापला होता. आपला राग व्यक्त करण्यासाठी त्याने अशा प्रकारचे कृत्य केले. तमन्नाच्या दिशेने चप्पल फेकल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. तमन्नाने अलीकडे चित्रपटात ज्या भूमिका केल्या आहेत त्या आपल्याला अजिबात आवडलेल्या नाहीत. त्याच रागातून आपण हा हल्ला केला असे आरोपीने पोलिसांना चौकशीत सांगितले. वेगवेगळया कलमांखाली त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाहुबली चित्रपटाचे दोन भाग आले असून पहिल्या भागातील तिची भूमिका भरपूर गाजली. या रोलने तिच्याबद्दल अनेकांच्या मनात आकर्षण निर्माण केले आहे. प्रभासच्या नायिकेचा रोल तिने केला आहे. काही दक्षिणात्य चित्रपटांसह हिंदी चित्रपटही तमन्नाकडे आहेत.