शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:22 IST

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात भाष्य केले आहे. खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात. पण केवळ जिवंत राहणे हाच जीवनाचा उद्देश नसावा. मणसाची इतर अनेक कर्तव्य आहेत, असे भागवत यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, देशात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात चर्चा सुरू असतानाच भागवतांनी हे भाष्य केले आहे. 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. पण, मनुष्याला संज्ञानात्मक प्रेरणा मिळाली आणि तिने त्याला सर्वश्रेष्ठ बनवले. मात्र, केवळ खाणे-पिणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर प्राणीही करतात. 

भागवत पुढे म्हणाले, जो शक्तीशाली आहे, तो जीवन जगेल, हा जंगलाचा नियम आहे. मात्र, सर्वात योग्य व्यक्ती इतरांना जगण्यास मदत करेल, ही माणसाची व्याख्या आहे. ते कर्नाटकातील चिकबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्लीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साईं युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभादरम्यान भागवत बोलत होते. 

भागवत म्हणाले, ‘‘जर 10-12 वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते, की भारत मोठी प्रगती करेल, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते.’’ ते म्हणाले, राष्ट्राची प्रक्रिया एकाएकीच सुरू झाली नही, तर ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंद पुढे घेऊन गेले.  आध्यात्मिक साधनांच्या माध्यमाने उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते. कारण अद्याप विज्ञानाला सृष्टीचा उगम समजलेला नाही, असेही भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKarnatakकर्नाटक