शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे खाणे-पिणेही महागणार; इंधन महागल्याने दरवाढीचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 12:12 IST

तेलाच्या पुरवठ्यात घट होण्याची भीती, इंधन महागल्याने दरवाढीचे चटके

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाला मंगळवारी २५ दिवस पूर्ण झाले. आतापर्यंत १० हजारहून अधिक जण यात मारले गेले. आंतरराष्ट्रीय संघटनांनी युद्ध मिटावे यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने युद्ध असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. तेलच नव्हे खाण्या-पिणेही महागेल असा इशारा दिला आहे. जागतिक बँकेच्या कमोडीटी मार्केट आऊटलुकमध्ये ही बाब समोर आली आहे. 

यामुळे जागतिक स्तरावर खनिजतेलाच्या पुरवठा साखळीला फटका बसून जगभर तेलाचे भाव भडकू शकतात. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होऊ शकतात, असे म्हटले आहे. 

हे युद्ध दीर्घ काळ चालल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्यांदाच विजेचे दुहेरी संकट निर्माण होईल.    - इंदरमित गिल, मुख्य अर्थतज्ज्ञ, जागतिक बँक

युद्धामुळे खनिजतेल महागल्याने जगभरात खाद्यपदार्थही महागणार आहेत. खाद्य महागाई दर वाढल्याने विकसनशील देश सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. युद्धामुळे या देशांसमोरील अडचणींमध्ते णखी भर पडू शकते.- अहान कोसे, उपमुख्य अर्थतज्ज्ञ, जागतिक बँक

लघु व्यत्यय : युद्ध फार काळ न भडकल्यास याचा फटकाही मर्यादित  बसेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती ८१ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली येऊ शकतात.

मध्य व्यत्यय : इस्रायल-हमास युद्धाची व्याप्ती वाढल्यास युद्धामुळे व्यापाराला मध्यम स्वरूपाचा फटका बसू शकतो. या स्थितीत जागतिक स्तरावर तेलाच्या पुरवठ्यात दररोज ३ ते ५ दशलक्ष बॅरलपर्यंत घट होऊ शकते. यामुळे जगभरात तेलाच्या किमती ३५ टक्क्यांनी वाढू शकतात.

मोठा व्यत्यय : युद्ध दीर्घ काळ चालल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. जागतिक स्तरावर तेल पुरवठ्याला प्रतिदिन ६ ते ८ दशलक्ष बॅरलची घट होऊ शकते. त्यामुळे तेलाच्या किमती ५६ ते ७५ टक्क्यांनी वाढून १४० ते १५७ डॉलर बॅरलपर्यंत भडकू शकतात. 

 

टॅग्स :businessव्यवसायInternationalआंतरराष्ट्रीय