शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

By महेश गलांडे | Published: February 26, 2021 7:29 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांना अनुसरुन तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपाने जे सांगितलं, तेच निवडणूक आयोगाने केलंय.

कोलकाता- देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूया राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या तारखांवर आक्षेप घेत, आयोगाला प्रश्न विचारले आहेत. Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry and West Bengal State Assembly election 2021 full schedule

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपाच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. यंदा पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान होत आहे. पण, एकाच जिल्ह्यात तीन टप्प्यांत का मतदान घेण्यात येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसेच, बंगालमध्ये बंगालीच राज्य करणार, बाहेरच्यांना आम्ही घुसू देणार नाही, असेही त्यांनी म्हटलंय. 

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांना अनुसरुन तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपाने जे सांगितलं, तेच निवडणूक आयोगाने केलंय. गृहमंत्र्यानी आपल्या ताकदीचा दुरुपयोग केला आहे. पण, आता खेळ सुरू झालाय, आम्ही खेळू आणि जिंकूच. भाजपाला नक्कीच पराभूत करू, असा विश्वासही ममता बॅनर्जींनी व्यक्त केलाय. 

कोरोनाचा विचार करुन निवडणुका

कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.  

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक

पहिला टप्पा - 27 मार्च मतदानदुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदानतिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदानचौथा टप्पा - 10 एप्रिल मतदानपाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदानसहावा टप्पा- 22 एप्रिल मतदानसातवा टप्पा-  26एप्रिल मतदानआठवा टप्पा- 29 एप्रिल मतदान

निकाल - 2 मे रोजी 

टॅग्स :ElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग