शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

ओबीसी व आर्थिक दुर्बलांबाबत  समुपदेशन कोर्टाच्या निर्णयानंतर; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 04:57 IST

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाला सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी हा शब्द दिला. 

नवी दिल्ली : एमबीबीएस, बीडीएस, एमडी, एमएस, एमडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय स्तरावरील एकूण जागांमध्ये ओबीसींना २७ टक्के व आर्थिक दुर्बलांना  (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दिले आहे. त्याविरोधातील आव्हान याचिकांवर सर्वोच्च न्यायालय जोवर निर्णय देत नाही, तोवर नीट-पीजीच्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करणार नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी या न्यायालयाला सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाला सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी हा शब्द दिला. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे समुपदेश प्रक्रिया सुरू झाली, तर विद्यार्थ्यांसाठी ते अडचणीतचे ठरेल असे खंडपीठाने म्हटले. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे समुपदेशन सोमवारी सुरू होणार होते हे काही विद्यार्थ्यांचे वकील अरविंद दातार यांनी निदर्शनास आणून दिले होते. दातार म्हणाले की, आरक्षणासंदर्भात २९ जुलैला जारी केलेल्या अधिसूचनेवर कोर्ट निकाल देईपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडण्याचीही शक्यता  असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज म्हणाले की, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देईपर्यंत नीट-पीजीच्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करणार नाही. न्यायलयाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

घटनात्मक वैधता तपासणार- केंद्र सरकारच्या धोरणात्मक बाबींमध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. आर्थिक दुर्बलांच्या आरक्षण धोरणामुळे राज्यघटनेतील तरतुदींचा भंग झाला नाही ना हे न्यायालय आवर्जून पाहणार आहे. - या मुद्द्यावर केंद्रीय सामाजिक न्याय तसेच कार्मिक खात्याने आठवडाभरात प्रतिज्ञापत्रे सादर करावीत, असा आदेश दिला होता. याबाबत जर केंद्र सरकारने काही हालचाल केली नाही तर न्यायालय आदेश देईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय