शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पुणे शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये होतेय कोरोनासंदर्भातल्या केंद्राच्या नियमावलीचे काटेकोर पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:46 IST

पुण्यात देशातील तिन्ही दलांला लागणारे अधिकारी तयार करणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था

ठळक मुद्देप्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण कक्ष, स्क्रिनिंगची सुविधा, शहरात महत्वाच्या संस्थाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही विषेश काळजी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना 

निनाद देशमुख- पुणे : कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये केले जात आहे.  ताप तपासणी, निर्जंतुकीकरण कक्ष शहारातील आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. याच बरोबर कार्यालयात मोजक्याच कर्मचारी अधिकारी काम करत असून सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळण्यात येत आहेत. गरजेनुसार जवानांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने आण केली जात आहे, अशी माहिती लष्कराचे प्रसिद्धी प्रमुख कर्नल अमन आनंद यांनी दिली.पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे कार्यालय आहे. हवाई दलाचा देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हवाईतळ पुण्यात आहे. देशातील तिन्ही दलांला लागणारे अधिकारी तयार करणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था आहे. या बरोबरच पाच मिलिटरी स्टेशन, देहू, पुणे आणि खडकी या तिन लष्करी छावण्या, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यायल, बॉम्बे सॅपर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशचे कार्यालय, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय या सारख्या अनेक महत्वाच्या लष्कराच्या आस्थापना आहेत. या सोबतच संरक्षण संशोधन आणि विकास (डीआरडीओ)संस्थेच्या अनेक महत्वाच्या प्रयोगशाळा शहरात आहे.या सर्व आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने केलेल्या सुचनांचे पालन केले जात आहेत. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात ५० टक्के मनुष्यबळात काम केले जात आहे. या ठिकाणी येणा-यांची ताप तपासणी केली जात आहे. निर्जंतुकीकरणासाठी कक्ष उभारण्यात आले आहे. कार्यालयात सोशल डिस्टंसिंग पाळले जात आहे. एखादा जवान आजारी असल्यास त्याची कमांड हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात येत आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही विषेश काळजी घेतली जात आहे. प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर येणा-या जाणा-यांची तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. प्रबोधिनित विद्यार्थ्यांची रोज तपासणी करण्यात येत आहे. मेसमध्ये तसेच क्लासरूमध्ये सोशल डिस्टसिंग पाळले जात आहेत. या सोबतच बाहेर होणारे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बंद करण्यात आले आहे. तर प्रबोधिनीत बाहेरून येणाऱ्यांनाही बंदी घालण्यात आली आहे.एअरफोर्स स्टेशन या ठिकाणीही केंद्राच्या सुचनांचे पालन करण्यात येत आहे. अंतर्गत तसेच परदेशातील नागरी उड्डाणांसाठी हे तळ बंद करण्यात आले आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या तसेच इतर महत्वाच्या विमानांचे उड्डाण होत आहे...............देशांत असलेल्या सर्व लष्करी आस्थापना, कार्यालये तसेच सीमेवर असलेल्या जवानांना कोरोनापासून दुर ठेवण्यासाठी केंद्राने दिलेल्या नियमावलीचे पालन केले जात आहे. या सोबतच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. आतापर्यंत लष्करात रूग्ण आढळलेले नाही. भविष्यातही त्या दृष्टीने काळजी घेण्यात येईल.- कर्नल अमन आनंद, प्रसिद्धी प्रमुख, लष्कर

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर