शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजाप्रमाणे लक्ष केंद्रित करा; ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये दबाव टाळण्यासाठी मोदींचा विद्यार्थ्यांना मंत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 06:11 IST

पालकांनी सामाजिक स्थितीमुळे मुलांवर दबाव आणू नये, तसेच विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे

नवी दिल्ली :

पालकांनी सामाजिक स्थितीमुळे मुलांवर दबाव आणू नये, तसेच विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिला. स्टेडियमवर चौकार, षटकार मारण्याचा उद्षोघ सुरू असला, तरी फलंदाज ज्या पद्धतीने केवळ चेंडूवर लक्ष केंद्रित करतो. विद्यार्थ्यांनी अगदी तसेच केले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

‘परीक्षा पे चर्चा’ या वार्षिक संवादाच्या सहाव्या आवृत्तीत मोदी बोलत होते. शुक्रवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मोदींनी मुलांच्या परीक्षा आणि आयुष्यातील ताणतणाव या प्रश्नांना उत्तरे दिली.

कुटुंबातील निराशेला सामोर कसे जायचे?- पाटणाहून प्रियांका कुमारीने प्रश्न विचारला की, निकाल चांगले न आल्यास कुटुंबातील निराशेला सामोरे कसे जायचे? आजकाल विद्यार्थी हात कापून घेत आहेत, ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इतरांवर विश्वास ठेवत नाहीत? - क्रिकेटमध्ये गुगली असते. लक्ष्य एक, दिशा दुसरी. तुम्ही मला पहिल्याच चेंडूवर मैदानाबाहेर काढू इच्छिता असे दिसते. कुटुंबीयांच्या अपेक्षा असतील, तर ते स्वाभाविक आहे. यात चुकीचे काही नाही, पण सामाजिक स्थितीमुळे कुटुंबातील सदस्य अपेक्षा करत असतील, तर ती चिंतेची बाब आहे.  

दबावाखाली येऊ नका एका विद्यार्थ्याने परीक्षेतील दबावाविषयी प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले, ‘दबावाखाली येऊ नका. तुम्ही कधी क्रिकेट बघायला गेला आहात का, काही फलंदाज आले की, संपूर्ण स्टेडियमवर चौकार-चौकार, षटकार-षटकारचा गजर सुरू होता, परंतु फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसार चौकार-षटकार मारतो का? नाहीतर त्याचे लक्ष फक्त चेंडूवर असते. तो चेंडू जसा आहे तसा खेळतो. तुम्ही तसेच केले पाहिजे....तर टीकेची पर्वा करू नकामोदी म्हणाले की, लोकशाहीत टीका शुद्धीकरणासारखी असते. टीका ही समृद्ध लोकशाहीसाठी शुद्ध यज्ञ आहे. जर तुम्ही मेहनती आणि प्रामाणिक असाल, तर तुम्ही टीकेची पर्वा करू नका कारण ती तुमची ताकद बनते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विचार करा, विश्लेषण करा, कृती करा आणि मग तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा, असेही ते म्हणाले. मोदींचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी