शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

CoronaVirus News : मोदी सरकार 3 लाख कोटींच्या पॅकेजची करू शकते घोषणा; नोकरदारांना मिळणार दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 15:23 IST

शाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते. 

ठळक मुद्देकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी 3 लाख कोटींचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते. 

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी 3 लाख कोटींचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, तो 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीपर्यंत वाढविण्यात आला, जो 3 मेपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात तो 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक कामे पूर्णपणे बंदावस्थेत आहेत. परंतु मेच्या पहिल्या आठवड्यात काही उद्योगांना सुरुवात करण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. भारत ही आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते. मनी कंट्रोलने बिझनेस स्टँडर्डचा हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सरकारी कर्ज आर्थिक वर्ष 2021साठी 7.8 लाख कोटी रुपयांवरून 12 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या सरकार निर्णय घेणार असून, येणाऱ्या पैशांतूनच प्रोत्साहन पॅकेज दिली जाण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था हळूहळू खुली झाल्यामुळे सरकारला लघु उद्योगांना मदत करण्याची इच्छा आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस येणारं नवं पॅकेज मागील 1.7 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजपेक्षा बरेच मोठे असणार आहे. नोकरदारांसाठी होऊ शकते मोठी घोषणा- रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पुढील नवं पॅकेज देशातील गरीब घटक आणि नोकरी गमावलेल्या लोकांसाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. छोट्या-मोठ्या कंपन्यांना करमुक्ती व इतर उपाययोजनांद्वारे दिलासा मिळू शकतो. दोन वरिष्ठ अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.(१) MSMEसाठी कार्यशील भांडवल कर्जाच्या योजनेची घोषणा होऊ शकते.(२) थेट लाभ हस्तांतरण योजने(डीबीटी)चा विस्तार होऊ शकतो. याचा अर्थ सामान्य लोकांच्या खात्यात जास्त पैसे येऊ शकतात.(३) मनरेगाची देयके म्हणजेच वेतनात वाढ होऊ शकते.(४) पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नवीन घोषणा देखील होऊ शकतात.(५) विमान चालन, पर्यटन, प्रवास आणि वाहन या पॅकेजअंतर्गत मोठ्या घोषणा देखील होऊ शकतात.लघु उद्योगांना मदत करण्यासाठी जगभरातील सरकारे मदत पॅकेजेस देत आहेत. पे-चेक प्रोटेक्शन प्रोग्राम अंतर्गत नवीन कर्ज देण्यासाठी 320 अब्ज डॉलर्सची तरतूद करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्याअंतर्गत अशा कंपन्यांचे कर्ज माफ केले जाईल, जे त्यांच्या कर्मचार्‍यांना किमान आठ आठवडे पगारावर ठेवतात. त्याचप्रमाणे फिलिपिन्स सरकारने छोट्या उद्योगांना 69 दशलक्ष डॉलर्सची मदतही दिली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

International Nurses Day 2020 : ...म्हणून 'या' राज्यातील नर्सना आहे जगभरात पसंती

CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcorona virusकोरोना वायरस बातम्या