शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:45 IST

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर देशातील नागरी उड्डयन क्षेत्राबाबत ...

योगेश पांडे,लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर देशातील नागरी उड्डयन क्षेत्राबाबत विविध चर्चांना उधाण झाले आहे. सर्वसाधारणत: देशाअंतर्गत उड्डाणांना हवेत तांत्रिक बिघाडांशिवाय दुसरा फारसा धोका नसतो. मात्र, २०२३ सालापासून सीमेजवळ विमानांचे उड्डाण करणे धोकादायक झाले आहे.

हवेत असलेल्या विमानांच्या जीपीएस किंवा जीएनएसएसमध्ये (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम) हस्तक्षेप करण्याचे (जीपीएस स्पूफिंग) शेकडो वेळा प्रयत्न असल्याची बाब समोर आली आहे. नोव्हेंबर २०२३ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत साडेचारशेहून अधिक वेळा विविध विमानांच्या जीपीएसमध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जीपीएस ‘स्पूफिंग’ नेमके काय प्रकरण आहे?जीपीएस स्पूफिंगमध्ये जाणूनबुजून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) द्वारे प्रसारित होणाऱ्या सिग्नलमध्ये फेरफार करण्यात येतात. जीपीएस/ जीएनएसएस जॅमिंगचा उद्देश जीपीएस रिसीव्हर्सना खोटी स्थाने किंवा वेळ दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा असतो. या स्पूफिंगमुळे पायलट्सला चुकीचा डेटा मिळतो. त्यामुळे नेव्हिगेशनल सिस्टम, डिव्हाइस आणि उपग्रह-आधारित प्रणालीला फटका बसू शकतो. 

कुठे घडल्या हस्तक्षेपाच्या घटना?विमानांच्या जीपीएस प्रणालीत हस्तक्षेप झाल्याच्या अनेक तक्रारी विविध एअरलाइन्सकडून ‘डीजीसीए’कडे (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) करण्यात आल्या. विशेषत: अमृतसर व आजूबाजूच्या भागात हे प्रकार जास्त झाले आहेत. नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ या १७ महिन्यांत ४६५ वेळा जीपीएस किंवा जीएनएसएस प्रणालीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला. याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यावर डीजीसीएकडून नोटीस टू एअरमन जारी करण्यात येते. २०२३ सालीच इराकमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न दिसून आले होते. त्यानंतर विविध देशांतील एअरलाइन्सला या समस्येचा सामना करावा लागतो आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद