शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

युद्धाच्या धुमश्चक्रीत भारत-पाक मैत्रीचे फूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 07:48 IST

अंकित हा भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेला होता. कीव्ह येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. 

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तिथून बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे किती हाल होताहेत,हे आपण रोजच्या रोज बघतो आहोत. अनेक भारतीय मुलांना तर सैनिकांच्या हातचा बेदम मारही खावा लागला. अन्न नाही,पाणी नाही, अंगावर केव्हाही बॉम्ब पडेल अशी धास्ती घेऊन अनेक जण या दोन्ही देशातून पलायनाचा प्रयत्न करीत आहेत. सरकारतर्फे ही सुटकेचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांनाही आपल्या नागरिकांना सोडवणं अवघड जात आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये सगळ्याच देशाच्या विमानांना बंदी आहे. त्यामुळे काहीही करून पोलंड सारख्या शेजारच्या देशांमध्ये पोहोचणं ही अडकलेल्या नागरिकांची आणि विद्यार्थ्यांचीच जबाबदारी झाली आहे. 

युद्धाच्या या वातावरणात अनेक देशांच्या निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीवही गमवावा लागला असला तरी बहादुरीच्या अनेक कहाण्याही ऐकायला येत आहेत. त्यातलीच एक कहाणी आहे, हरयाणातील एका लढवय्या तरुण विद्यार्थ्याची... भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे राजकीय वैमनस्य कितीही टोकाला पोहोचलेले असले, तरी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये मात्र किती गाढ स्नेहाचे संबंध आहेत, हे दर्शवणारी ही हृदयस्पर्शी कहाणी! हरयाणाच्या हिसारचा रहिवासी असलेल्या अंकितने आपल्या धाडसानं या स्नेहाची, प्रेमाची आणि दोस्तीची चुणूक नव्यानं दाखवून दिली आहे. 

अंकित हा भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेला होता. कीव्ह येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. अंकित म्हणतो,२५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता आमच्या कॉलेज जवळच एक मोठा बॉम्बस्फोट झाला. सारेच विद्यार्थी हादरले. त्यानंतर कॉलेजच्या ८० विद्यार्थ्यांना एका बंकरमध्ये नेण्यात आलं. तिथे माझ्याशिवाय एकही भारतीय विद्यार्थी नव्हता. मारिया नावाची एक पाकिस्तानी विद्यार्थिनी मात्र या गटामध्ये होती. या बंकरमध्येही खाण्या-पिण्याशिवाय किती दिवस राहणार आणि किती दिवस आपण तग धरणार म्हणून इथून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. मारियाही अतिशय घाबरलेली होती. मी इथून निघतोय, हे मारियाला कळताच,‘प्लीज,मलाही तुझ्याबरोबर नेतोस का?’, अशी आर्जवी विनंती तिनं केली. मी परिस्थितीचं सारं गांभीर्य तिला समजावून सांगितलं, रस्त्यात काहीही होऊ शकतं, याचीही कल्पना तिला दिली. मग २८ फेब्रुवारी रोजी तिथून लपतछपत,गोळीबार आणि स्फोटांपासून स्वत:ला वाचवत कीव्ह येथील रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पायीच आम्ही निघालो.. पाच किलोमीटरचं हे अंतर आम्हाला पन्नास किलोमीटरसारखं वाटलं. त्यात दोन दिवस माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. चालताना पायात गोळे येत होते, चक्कर येत होती. मारियाची स्थिती तर माझ्याहून वाईट होती. शेवटी तिचं सारं सामान मी माझ्या अंगाखांद्यावर घेतलं आणि आम्ही गोळीबार, स्फोटांपासून वाचत कसंबसं एकदाचे कीव्ह रेल्वेस्टेशनवर पोहोचलो..”

पण अंकित आणि मारियाचा पुढला प्रवास सोपा नव्हता. रेल्वेस्टेशनवर लोकांचा महापूर लोटलेला. प्रवाशांनी रेल्वे खच्चून भरलेल्या होत्या. अगदी एकमेकांच्या डोक्यावर आणि अंगाखांद्यावर, जिथे कुठे साधी फट दिसेल तिथेही लोक घुसलेले होते. रेल्वेत चढायचा खूप प्रयत्न दोघांनीही केला, तीन रेल्वे सोडून द्याव्या लागल्या. शेवटी जीव पणाला लावून कसाबसा त्यांनी एका डब्यात प्रवेश केला. अंकित म्हणतो, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. रेल्वेत बसल्यानंतर तासाभरातच आम्ही ज्या डब्यात बसलो होतो, तेथून काही फुटांवर रेल्वे रुळाजवळ बॉम्बस्फोट झाला. गोळीबार सुरू झाला. खिडकीची काच फोडून एक गोळी आत आली आणि माझ्या डोक्यावरून केवळ काही सेंटिमीटर अंतरावरून गेली. केवळ नशीबानंच मी वाचलो. गोळी लागू नये म्हणून ट्रेनमधील सर्वांनीच जमेल तसं, अगदी एकमेकांच्या अंगावर झोपून घेतलं..”एक मार्चला ते कसेबसे तेर्नोपील या युक्रेनमधीलच एका रेल्वेस्टेशनवर पोहोचले. येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्याशी मारियाचा संपर्क झाला. त्यानंतर  पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दोघांनाही मेडिकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमध्ये ठेवलं. अंकितचं खूप कौतुक केलं. ही वेळ आपसी दुश्मनीची नाही, तर एकमेकांतल्या भाईचाऱ्याची असल्याचं सांगत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीच नंतर त्यांना स्वत:च्या खर्चानं एका बसमध्ये बसवून रोमानियाच्या सीमेकडे पाठवून दिलं. पण बस ड्रायव्हरनं वीस किलोमीटर आधीच त्यांना उतरवून दिलं. तिथून वीस किलोमीटर चालत दोघंही रुमानियाच्या सीमेवर पोहोचले.

‘थँक यू बेटा !..’हा मजकूर लिहित असेपर्यंत दोघंही रोमानियातून बाहेर पडलेले नव्हते. अंकित सांगतो, इथेही हजारो लोक ताटकळत उभे आहेत. आम्ही रोमानियाच्या छावणीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. इथे प्रचंड थंडी आहे. तापमान शून्याच्याही बऱ्याच खाली आहे. मला ताप आहे. अंग ठणकतं आहे. अजून कोणतीच वैद्यकीय मदत आम्हाला मिळालेली नाही. स्थानिक लोक थोडीफार मदत करताहेत. मारियाच्या पालकांशी फोनवर संपर्क झाला आहे. आपल्या मुलीला वाचवत, युक्रेनमधून बाहेर काढत इथपर्यंत आणल्याचे आभार मानताना डोळ्यांत पाणी आणून ते मला म्हणाले, ‘थँक यू बेटा!..’

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया