शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशातील किनाऱ्यांवर तरंगत्या जेट्टी उभारणार; मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:07 IST

- मधुकर ठाकूर उरण : भारतातील संपूर्ण किनारपट्टीवर जागतिक दर्जाचे तरंगते पायाभूत प्रकल्प जनतेसाठी उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी ...

- मधुकर ठाकूरउरण : भारतातील संपूर्ण किनारपट्टीवर जागतिक दर्जाचे तरंगते पायाभूत प्रकल्प जनतेसाठी उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने तरंगत्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार केला आहे. यावर जनतेकडून मार्गदर्शक सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत.प्रायोगिक तत्त्वावर अशा तरंगत्या जेट्टींचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणिजलमार्ग मंत्रालयाने अनेक ठिकाणी बांधकाम केले आहे. हे करताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आहे. यामध्ये गोव्यात प्रवासी तरंगत्या जेट्टी, साबरमती आणिसरदार सरोवर धरण येथील सी-प्लेनसाठीचे जल विमानतळ यांचा समावेश आहे. सध्या देशाच्या विविध किनारपट्टीवर अशा ८० प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.कामासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक नियम बनविले आहेत. यासाठी मंत्रालयाने आयआयटी चेन्नईला, टिकावू तरंगते बांधकाम तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विषयक निकष तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा त्याच्या तंत्रज्ञानविषयक गरजांच्या प्रस्तावित वैशिष्ट्ये व तपशिलांसह जनतेसाठी जारी करण्यात आला आहे. यावर जनतेकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. http://shipmin.gov.in/sites/default/files/proforma_guidelines या लिंकवर मार्गदर्शक सूचनांचा मसुदा पाहता येतील. मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जारी करणे आणि त्यावर जनतेकडून सूचना, हरकती मागविणे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. तरंगत्या बांधकामाचे होणारे फायदे तरंगते बांधकाम उभारण्याचे काम पारंपरिक जेट्टीच्यातुलनेत अत्यंत लवकर सहा-आठ महिन्यांत पूर्ण होते. त्या तुलनेत, पारंपरिक काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांहूनही अधिक काळ लागू शकतो. तरंगत्या जेट्टीमुळे सतत फ्री बोर्ड उपलब्ध असतो. ज्यामुळे जहाजावर मालाचा साठा करणे, तसेच मच्छीमारांचा माल जहाजांवर चढ-उतार करणे सोपे जाते. परिणामी, मच्छीमारांचे उत्पादन आणि सुरक्षा दोन्हीसाठी ही व्यवस्था उपकारक ठरते.