शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

बसखाली अडकून मृतदेहाची ७० किमीपर्यंत फरफट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:31 IST

तमिळनाडूमधील कुन्नूर येथून बंगळुरू येथे आलेल्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसखालील चॅसिसमध्ये अडकून एका तरुणाचा मृतदेह ७० किमी फरफटत आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला.

बंगळुरू: तमिळनाडूमधील कुन्नूर येथून बंगळुरू येथे आलेल्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसखालील चॅसिसमध्ये अडकून एका तरुणाचा मृतदेह ७० किमी फरफटत आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला. प्रवाशांना झोपण्याची सोय असलेली ही बस शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास बंगळुरू येथे पोहोचली. शहरात दोन-तीन स्टॉपवर प्रवाशांना उतरवून बस शेवटी बसडेपोमध्ये आणून उभी केली गेली. ती धुण्यासाठी नेली असता, तिच्या खाली एक मृतदेह अडकले असल्याचे आढळून आले.हे प्रेत ३० ते ४० वर्षांच्या पुरुषाचे आहे, पण त्याची ओळख पटली नाही. पोलिसांना कळवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले गेले. या घटनेच्या संदर्भात बसचालक मोहिनुद्दिन यास अटक झाली आहे. निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत होणे व पुरावा नष्ट करणे असे त्याच्यावर आरोप आहेत. येताना वाटेत चेन्नापटना येथे बसखाली काही तरी आल्याचे जाणवले व जोरदार धक्का बसला, पण अपरात्र असल्याने आपण बस थांबवून पाहिले नाही, असे मोहिनुद्दिनने सांगितले. (वृत्तसंस्था)>इतक्या लांब फरपटत?चेन्नापटना हे ठिकाण बंगळुरूपासून ७० किमी अंतरावर आहे. तेथे बसखाली एखादी व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडली असावी, असे गृहित धरले, तरी तो मृतदेह बसला अडकून एवढ्या लांबपर्यंत फरफटत यावे, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात