26 ऑगस्ट : हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाला घातलेली बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता
20 ऑगस्ट : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी डॉ. उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली
साता-यातील संतोष पोळ या डॉक्टराने 13 वर्षांत तब्बल 6 हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या 100 मीटर शर्यतीत उसेन बोल्टने तिसरे सुवर्णपदक जिंकले होते
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकने कास्यंपदक पटकावले तर पी.व्ही.सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावले होते
7 ऑगस्ट : फ्रान्सचा कलात्मक जिम्नॅस्टिकपटू सॅमीर ऐत सैद याचा ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान पाय मोडला होता
रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारात दीपा कर्माकरचे थोडक्यात पदक हुकले होते
उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी असल्याचा ठपका क्रीडा लवादाने ठेवल्याने भारतीय मल्ल नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळू शकला नाही
9 ऑगस्ट : सशस्त्र दल विशेष अधिकारी कायदा अफ्स्पा रद्द करण्याच्या मागणीसाठी 16 वर्षांपासून उपोषण करणा-या इरोम चानू शर्मिला यांनी उपोषण मागे घेतले होते
9 ऑगस्ट : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पूल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती
50 लाख रुपयांच्या मोबदल्यात मूत्रपिंड विक्रीप्रकरणी पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील 5 जणांना अटक करण्यात आली होती
आनंदी पटेल यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा विजय रुपानी यांनी स्वीकारली
3 ऑगस्ट : महाडमधील सावित्री नदीवरील पूल ढासळल्याने हाहाकार उडाला होता
औरंगाबादमधून 8 मे 2006 रोजी हस्तगत करण्यात शस्त्र व स्फोटांच्या साठाप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने सूत्रधार अबू जुंदालसह सात जणांना आजन्म कारावासाटी शिक्षा सुनावण्यात आली