शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 10:23 IST

भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली: आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पुराचं संकट आ वासून उभं आहे. आसाममधील 10 गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनच्या अखत्यारित येणाऱ्या तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यानं एका नदीचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यानं नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. 16 ऑक्टोबरला तिबेटमध्ये भूस्खलन झालं. त्यामुळे यारलुंग सांग्पो नदीचा मार्ग बंद झाला. मात्र भूस्खलनामुळे तयार झालेला बांध फुटल्यास साचलेलं पाणी अतिशय वेगात वाहू लागेल. त्यामुळे खालील भागात असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला धोका आहे. या नदीला अरुणाचल प्रदेशात सियांग नावानं ओळखलं जातं. तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्रा म्हणून परिचित आहे. या नदीचं पाणी सोडण्यास सुरुवात करण्याची आल्याची माहिती चीननं भारताला दिली आहे. या पाण्याचा वेग प्रति सेकंद 18 हजार क्यूबिक मीटर इतका आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली गेला आहे. आसामच्या धेमाजी, डिब्रूगढ, लखीमपूर, तिनसुकिया आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सियांग नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देऊन चीन भारताचं नुकसान करु शकतो, असा संशय भारतीय यंत्रणांना आहे. चीनकडून अनेकदा सतर्कतेचा इशारा उशीरा दिला जातो. त्यामुळे नुकसान टाळता येणं अवघड होतं. गेल्या वर्षी काझीरंगामध्ये पूर आला होता. त्यात अनेक प्राण्यांनी जीव गमावला होता. या पुराची माहितीदेखील चीननं भारताला उशीरा दिली होती. 

टॅग्स :floodपूरchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश