शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पाच वर्षांत रेल्वेत आमूलाग्र परिवर्तन पाहायला मिळेल

By admin | Updated: November 14, 2016 01:27 IST

दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे.

नवी दिल्ली : दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे. प्रत्येक प्रवाशाच्या १ किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वेला ७४ पैसे खर्च येतो, पण भाड्यापोटी त्याच्याकडून अवघे ३७ पैसे मिळतात. तोटा सहन करूनही रेल्वे २४ तास करते आहे. त्यामुळे रेल्वेचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून, येत्या ५ वर्षात त्यात आमुलाग्र परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळेल, असे उद्गार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार मित्तल यांनी काढले.मित्तल म्हणाले, दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर डिसेंबर २0१९ पर्यंत पूर्ण होईल. दिल्ली-हावडा कॉरिडॉरही लवकर सुरू व्हावा असे प्रयत्न आहेत. या दोन्ही मार्गांवरून मालवाहतूक बंद झाली, की प्रवासी गाड्यांची गती वाढेल. राजधानी, शताब्दीसारख्या ट्रेन्स ताशी १६0 कि.मी. वेगाने, मेल एक्सप्रेस ताशी ८0 कि.मी. वेगाने, पॅसेंजर व मालवाहतुकीच्या ट्रेन्स ताशी ५0 कि.मी. वेगाने धावू लागतील आणि प्रवासाचा वेळ वाचेल.आधुनिकीकरणासाठी आम्ही जीवन वीमा महामंडळाकडूनदीड लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलले. बाजारपेठेत रोखे व बाँडसच्या माध्यमातून पैसे उभे केले. काही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थांचीही मदत होत आहे. रेल्वे वाहतुकीसाठी दरवर्षी १२ हजार कोटी रुपयांची वीज व १८ हजार कोटी रुपयांचे डिझेल असे ३0 हजार कोटी लागतात. त्यात १0 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट आहे. वीजनिर्मिती केंद्राशी वाटाघाटी करून स्वस्त दरात वीज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मित्तल म्हणाले. ईशान्येकडील राज्यांत याच वर्षापासून ब्रॉडगेज रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. पाच वर्षांत रेल्वेचे शून्य अपघात, अचून वेळापत्रक, मागेल त्याला प्रवासाचे आरक्षण, गाड्यांमध्ये बायो टॉयलेटमध्ये सुरू, गार्डरहित रेल्वे, क्रॉसिंगचे उच्चाटन असे महत्वाचे निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)