शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशात पाच वर्षांत शेतकऱ्यांवरील कर्ज वाढले ५७ टक्क्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 05:32 IST

२०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या काळात भारतातील शेतकरी कुटुंबांवरील सरासरी कर्ज तब्बल ५७.७ टक्क्यांनी वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : २०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या काळात भारतातील शेतकरी कुटुंबांवरील सरासरी कर्ज तब्बल ५७.७ टक्क्यांनी वाढले आहे. २०१३ मध्ये शेतकरी कुटुंबांवरील सरासरी कर्ज ४७ हजार रुपये होते. २०१८ मध्ये ते ७४,१२१ रुपये झाले.

राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कार्यक्रम अंमलबजावणी व सांख्यिकी मंत्रालयाने या सर्वेक्षणाचा अहवाल ‘सिच्युएशन असेसमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल हाउसहोल्डस् अँड लँड होल्डिंग्ज ऑफ हाउसहोल्ड इन रुरल इंडिया, २०१९’ या नावाने जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की,  जुलै-डिसेंबर २०१८ मध्ये देशातील थकीत कर्ज असलेल्या शेतकरी कुटुंबांची संख्या ४.६७ कोटी होती. २०१३ तुलनेत ही संख्या एक लाखाने कमी आहे. २०१८-१९ मध्ये देशातील एकूण शेतकरी कुटुंबांची संख्या सुमारे ९.३० कोटी होती. जुलै-डिसेंबर २०१८ मध्ये शेतकरी कुटुंबांवरील थकीत कर्जाची राष्ट्रीय सरासरी ७४,१२१ रुपये होती. ११ राज्यांतील शेतकरी कुटुंबांवरील थकीत कर्ज राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आढळून आले. त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. २.१४ लाख रुपयांच्या सरासरी थकबाकीसह आंध्र प्रदेश प्रथमस्थानी असून, नागालँडमध्ये सर्वाधिक कमी १,७५० रुपयांची सरासरी थकबाकी आढळून आली.

काय म्हणतो अहवाल?

अहवालानुसार, तीन राज्यांतील शेतकरी कुटुंबांवर प्रत्येकी सरासरी २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे. आंध्र प्रदेश (२.४५ लाख), केरळ (२.४२ लाख) आणि पंजाब (२.०२ लाख) ही ती तीन राज्ये होत. ५ राज्यांतील शेतकरी कुटुंबांवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त सरासरी थकीत कर्ज असल्याचे आढळून आले. हरियाणा (१.८२ लाख), तेलंगणा (१.५२ लाख), कर्नाटक (१.२६ लाख), राजस्थान (१.१३ लाख) आणि तामिळनाडू (१.०६ लाख) ही ती राज्ये होत. 

टॅग्स :Farmerशेतकरी