शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ५ वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून खाल्ल्या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या ४ गोळ्या; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 23:42 IST

सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्यानं मुलाची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनाही सापडेना उपाय

पाटणा: बिहारच्या खगडिया जिल्ह्यात आज एक विचित्र घटना घडली. पाच वर्षीय मुलाचे आई वडील मुलाला घेऊन रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना समस्या विचारली. आई वडिलांनी सांगितलेला घटनाक्रम ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला. कारण ५ वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून सेक्स पॉवर वाढवणाऱ्या औषधाच्या ४ गोळ्या खाल्ल्या होत्या.

मुलाचे कुटुंबीय त्याला तातडीनं खगाडियातील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी एमर्जन्सी विभागातील डॉ. बरकत अली यांना झाला प्रकार सांगितला. पाच वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून सेक्स पॉवर वाढवणारं औषध खाल्लं. यानंतर मुलगा त्रस्त झाला, त्याला घाम सुटला आणि गुप्तांगात समस्या जाणवू लागली. मुलाची प्रकृती बिघडू लागल्यानं कुटुंबीयांनी त्याला घेऊन रुग्णालय गाठलं.

मुलाची अवस्था पाहून डॉक्टर चिंतेत पडले. यावेळी डॉ. बरकत अली यांना त्यांच्या मित्राची आठवण आली. त्यांनी पाटणा एम्समधील बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. तिथले डॉक्टरदेखील घडलेला प्रकार ऐकून हादरले. आतापर्यंत अशा प्रकारचा एकही रुग्ण त्यांच्याकडे आला नसल्यानं त्यांना उपचारांची कल्पना नव्हती. याबद्दलचं कोणतंही संशोधन, औषध उपलब्ध नसल्यानं एम्सच्या डॉक्टरांना कोणतीच ठोस मदत करता आली नाही.

अखेर देशी उपाय कामीयानंतर डॉक्टरांनी देशी उपाय वापरण्याचा निर्णय घेतला. एम्सच्या डॉक्टरांनी बरकत अली यांना एक देशी पर्याय सुचवला. लहान मुलाला उलटी करण्यास सांगा. त्यामुळे त्याच्या पोटातील औषधाचा अधिकाधिक अंश बाहेर येईल, असा सल्ला एम्समधील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुलाला मीठ पाणी देण्यात आलं. मीठ टाकण्यात आलेल्या पाणी प्यायल्यानं मुलाला खूप उलट्या झाल्या. यानंतर तासाभरानं मुलाला बरं वाटू लागलं. त्याच्या गुप्तांगातील वेदना कमी झाल्या. यानंतरही डॉक्टरांनी मुलाला देखरेखीखाली ठेवलं.