शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'Vande Bharat' Expresses: गोवा-मुंबईसह पाच ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 08:25 IST

'Vande Bharat' Expresses: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पोहोचले आणि त्यांनी देशाच्या विविध भागांतील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पोहोचले आणि त्यांनी देशाच्या विविध भागांतील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान मोदी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वेस्थानकावर पोहोचले. तेथून त्यांनी दोन वंदे भारत एक्स्प्रेसला प्रत्यक्ष, तर ३ वंदे भारत एक्स्प्रेसला ऑनलाइन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये राणी कमलापती (भोपाळ)-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, खजुराहो-भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव (गोवा)-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड-बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस व हातिया-पाटणा वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. भर पावसात हजारो भोपाळवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहत होते.

मुंबईत जंगी स्वागत- मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा यांदरम्यान सुरू झालेल्या वंदे भारतमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. - राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्राने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्राच्या साहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी     सांगितले.    

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस