शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलची पाईपलाईन फोडली; 15 मिनिटांत पाच हजार लीटर डिझेल घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 19:25 IST

रविवारी दुपारी फतेहपूरच्या हरदौलापूर गावातील शेतामध्ये खोदल्यानंतर पाईप लाईनच्या चोरीचा पॉईंट मिळाला.

फतेहपूर : कानपूर-बरौनी येथील पेट्रोल, डिझेलची पाईपलाईन फोडून त्यामधून पाच हजार लीटर डिझेल चोरल्याच्या प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री याबाबतची माहिती मिळताच तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि पाईपलाईनची तपासणी सुरु करण्यात आली. 

रविवारी दुपारी फतेहपूरच्या हरदौलापूर गावातील शेतामध्ये खोदल्यानंतर पाईप लाईनच्या चोरीचा पॉईंट मिळाला. आता या छेदाला बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  कानपूर ते बरौनी असे इंधन पाईपलाईनद्वारे पाठविले जाते. शनिवारी मध्यरात्रीनंतर 56 मिनिटांसाठी पाईपलाईनमधील दाब कमी झाला. यामुळे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी पाईपलाईन फुटल्याचा संशय आला. यानंतर लगेचच डिझेलचा पुरवठा बंद करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजुने लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला. 

हरदौलापूर गावातील शेतामध्ये चोरीचा प्रकार समजल्यानंतर लगेचच पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. मात्र, पोलिसांनी शीघ्र प्रतिसाद न दिल्याने चोरट्यांना पकडणे कठीण बनल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाईपलाईनला व्हॉल्व लावण्यात आला होता. याद्वारे पाईप जोडून डिझेल काढण्यात येत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमीतकमी दोनवेळा पाच हजार लीटर डिझेल काढण्यात आले. या काळात डिझेलच पाठविण्यात येत होते. 

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इंधन अशाप्रकारेच चोरण्यात आले होते. तसेच दोन्ही वेळेला डिझेलच पाठविण्यात येत असल्याचे चोरांना कसे समजले, असा सवालही उपस्थित होत आहे. या टोळीमागे कोणीतरी तेल कंपनीतील अधिकारी तर नाही ना असा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला आहे. 

तीन वर्षांपूर्वी टोळक्याला पकडले होतेनोव्हेंबर 2014 मध्ये पोलिसांनी गंचौली गावाजवळ सहा जणांच्या एका टोळक्याला डिझेलसह पकडले होते. त्यांच्याकडे डिझेल टँकर, पाईप आणि ड्रील मशीन सापडली होती. 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल