शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पाच अतिरेक्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:15 IST

काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावात लपलेल्या पाच दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांच्या जवानांनी खात्मा केला आहे.

श्रीनगर : काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावात लपलेल्या पाच दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांच्या जवानांनी खात्मा केला आहे. त्यापैकी एक दहशतवादी शुक्रवारी रात्रीच चकमकीत ठार झाला होता आणि उरलेल्या चौघांना आज, शनिवारी सकाळी ठार करण्यात आले. काल सोपोरमध्ये दोन आणि गुरुवारी पुलवामामध्ये दोन असे चार अतिरेकी लष्कराच्या कारवाईत ठार झाले होते.शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावापाशी अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच, जवानांनी शुक्रवार दुपारपासूनच त्यांच्या शोध सुरू केला होता. जवानांनी आपणास घेरल्याचे कळताच, अतिरेक्यांनी काल संध्याकाळी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरात प्रत्युत्तर दिले. त्यात (पान ११ वर)(पान १ वरून) उमर मलिक नावाचा अतिरेकी मारला गेला. आज सकाळी जवानांनी शोध सुरू करताच, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूकेला.पण ते चारही अतिरेकीसुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाले, असे काश्मीरचे पोलीसप्रमुखएस. पी. वैद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>१ नागरिक ठार, १७ जखमीसुरक्षा दलाच्या जवानांवर शोपियामध्ये आज सकाळी जमावाने जोरदार दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी आधी लाठीमार करण्यात आला. पण तरीही जमावाची दगडफेक सुरूच राहिल्याने जवानांनी अश्रुधूर सोडला.पण त्याचाही उपयोग न झाल्याने जवानांनी पॅलेट गन्सचा मारा केला. त्या माऱ्यात १८ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्या संपूर्ण भागांत सध्या प्रचंड तणाव असून, खबरदारीचा उपाय म्हणून मोबाइलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच काही भागात जमावबंदीही लागू केली आहे. उमर मलिक याचा मृतदेह सकाळीच सापडला होता. त्याच्याकडील एके४७ रायफल ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच अन्य चौघांचे मृतदेहही सापडले आहेत, असे पोलीसप्रमुखांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या जवानांनी सुरू केलेल्या आॅपरेशन आॅलआऊट मोहिमेला यश येत आहे. गेल्या दोन दिवसांत ठार झालेले अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दिनचे होते आणि आजच्या कारवाईत लश्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी मारले गेले.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर