शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिला संरक्षण मंत्र्यांची भारतीय उपखंडात साडेपाच दशकांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 17:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवून नवा इतिहास रचला आहे.

मुंबई, दि. ३- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवून नवा इतिहास रचला आहे. सीतारामन यांच्यापुर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी १९७५ साली २० दिवसांसाठी व १९८० ते ८२ अशी दोन वर्षे या पदावरती होत्या मात्र फक्त संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान सीतारामन यांनी मिळवला आहे. भारतीय उपखंडात महिला मंत्र्याला संरक्षण खाते मिळणे फारसे नवे नाही. १९६० साली श्रीलंकेत सीरीमावो बंदारनायके या जगातील पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून काम करु लागल्या. १९६० ते १९६५ अशी पाच वर्षे त्यांनी काम पाहिले नंतर पुन्हा १९७० ते १९७७ अशी सात वर्षे त्या संरक्षणमंत्रीपदावरती होत्या.  हा कित्ता त्यांची मुलगी चंद्रिका कुमारतुंगा यांनीही गिरवला. चंद्रिका १९९४ ते २००१ इतका प्रदिर्घ काळ श्रीलंकेच्या संरक्षणमंत्री होत्या , या काळात श्रीलंकेत तमिळ वाघांमुळे यादवीही माजलेली होती. पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो १९८८ ते १९९० या दोन वर्षांसाठी संरक्षणमंत्री होत्या.बांगलादेशात १९९१ पासून संरक्षणमंत्रीपद महिलेकडेच आहे. बेगम खालिदा झिया यांनी बांगलादेशात संरक्षणमंत्री होण्याचा सर्वात प्रथम मान १९९१ ते ९६ या काळासाठी मिळवला. त्यानंतर पाच वर्षे शेख हसिना वाजेद या पदावर होत्या. पुन्हा पाच वर्षे झिया संरक्षणमंत्री झाल्या व २००९ पासून गेली  ८ वर्षे शेख हसिना पुन्हा संरक्षण मंत्रालय सांभाळत आहेत. यानंतर नेपाळमध्ये विद्यादेवी भंडारी यांनी २००९ ते २०११ अशी दोन वर्षे संरक्षणमंत्रीपदी काम केले आहे. याबरोबरच सध्या दुबईला पळून गेलेल्या थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा एका वर्षासाठी संरक्षणमंत्रीपद सांभाळत होत्या. आशियाई देशांत हाँगकाँग, फिलिपाइन्समध्येही महिला संरक्षणमंत्री होत्या. तसेच डाँमिनिका, निकाराग्वा,फिनलंड, कँनडा, नाँर्वे, झिम्बाब्वे, चिली, बहामा, फ्रान्स, क्रोएशिया, कोलंबिया, स्वीडन, सेनेगल, बेलिझ, गिनिआ बिसू, उरुग्वे, अर्जेंटिना, लँटविया, केप वर्दे, जमैका, झेच रिपब्लिक, इक्वेडोर, मादागास्कर, स्पेन, स्लोवेनिया, डेन्मार्क, बोटस्वाना, बोलिविया, जाँर्जिया, गँबन, लिथुआनिया, द.आफ्रिका, माँटेनेग्रो, पँराग्वे, नायजेरिया, नेदरलँडस, केनया, व्हेनेझुएला, अल्बानिया, जर्मनी, आँस्ट्रलिया या देशांमध्येही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे .