शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:41 IST

केंद्र सरकारने मात्र दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात एक अशा तिघांना लागण झाल्याचे नमूद केले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूंनी जगातील तब्बल ६0 देशांमध्ये हाहा:कार माजविला असून, भारतातही पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने मात्र दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात एक अशा तिघांना लागण झाल्याचे नमूद केले आहे. या आजारामुळेच आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे.शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत कोरोनाचे रुग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रुग्णालयातच ठेवावे, अशा सूचना आहेत.दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या अशा दोघा भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. तसेच राजस्थानात आलेल्या इटालियन नागरिकालाही संसर्ग झाला आहे. त्या सर्वांना रुग्णालयांत नेले असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. याआधी केरळमधील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. पण आता ते सुरक्षित आहेत. इटली व इराणमधून येणाºया प्रत्येकाची तपासणी करण्याचे आदेश विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.या आजाराने आतापर्यंत तीन हजार बळी घेतले आहे. त्यापैकी २९१२ मृत्यू चीनमधील असून, अन्य देशांत मरण पावलेल्यांची संख्या १५७ झाली आहे. याशिवाय जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९0 हजारांपर्यंत पोहोचली आहे. चीनपाठोपाठ कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरिया व इराणमध्ये आहेत. कोरियात ५00 रुग्ण असून, २८ जण मरण पावले आहेत. इराणच्या उपराष्ट्रपती व आरोग्यमंत्री यांनाही याची लागण झाली असून, त्या देशाच्या प्रमुखांच्या सल्लागाराचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. तिथे आतापर्यंत ६६ जण मरण पावले आहेत. अमेरिकेतही दोन जणांचा बळी घेतला आहे.रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान ६0 देशांत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे या सर्व देशांत अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांत शाळांना सुटी देण्यात आली आहे.>परदेशांत चित्रीकरणे रद्दचित्रपट अभिनेत्री दीपिका पडुकोन चित्रिकरणासाठी पॅरिसला जाणार होती. पण तिथे कोरोनाची लागण झाली असल्याने दीपिकाने पॅरिसला न जाण्याचा निर्णय घेतला. अनेक हिंदी चित्रपट निर्मात्यांनी भारताबाहेरील चित्रिकरण पुढे ढकलले आहे. कलाकारांनी अन्य देशांत जाण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.

टॅग्स :corona virusकोरोना