शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! देशात पहिल्यांदाच दिवसाला कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 04:57 IST

एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजारांवर; १० लाखांहून अधिक जण झाले पूर्णपणे बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ८३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १० लाखांवर गेली आहे.

देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहूनअधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या.

कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेऊन, त्यांची चाचणी व उपचार करणे ही नीती अवलंबल्यामुळेच देशातील मृत्यूदर कमी असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.

कोरोनाच्या १ कोटी ८१ लाखांहून अधिक चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या ४,४६,६४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या १,८१,९०,३८२ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या