बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 73.4क् टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब गावडे यांच्यात मुख्य चुरस होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाळासाहेब गावडे पूर्ण ताकतीने उतरले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा झाली. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले. सोमेश्वर, माळेगाव कारखान्याच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतक:यांची नाराजी, पाण्याचा प्रश्न, विकास कामे करून देखील सामान्य जनतेशी तुटलेली नाळ याचा परिणाम मतदानात दिसून येण्याची शक्यता आहे.
विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर बारामतीच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील नाराजी लक्षात घेऊन शहरात मतदान वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कधी नव्हे ते राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी गावोगावी जाऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन राष्ट्रवादी कार्यकत्र्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.
याच अनुषंगाने भाजपचे उमेदवार बाळासाहेब गावडे यांनी देखील शहरातील मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा बोगस मतदानाला वाव मिळू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. काही मतदान केंद्रांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तर काही ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले. (प्रतिनिधी)
4बारामती विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 8 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 26 हजार 768 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
4यामध्ये 1 लाख 22 हजार 85क् पुरुष मतदार तर 1 लाख 3 हजार 917 महिला मतदारांनी मतदान केले. विशेष म्हणजे 1क्क्
मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला.
4त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात राष्ट्रवादीच्या एका मोठय़ा गटाने एका रात्रीत पवित्र बदलून भाजपाला सहकार्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरात झालेल्या मतांवरच सर्व काही अवलंबून आहे.
4जिरायती भागातदेखील मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. सतत दुष्काळाशी दोन हात करणा:या जिरायती भागासह 22 गावांतील जनतेने कोणाच्या पारडय़ात झुकते माप दिले आहे, हे 19 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.