शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

मतदानाचा पहिला टप्पा: उद्या 16.63 कोटी मतदार 1625 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 17:46 IST

Lok Sabha Election: मतदानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे.

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या(दि.19 एप्रिल) सकाळी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होईल. म्हणजेच, उद्या देशातील शेकडो उमेदवारांचे भविष्य, कोट्यवधी मतदारांच्या एका बोटात असेल. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी देशातील सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला, ज्यात मतदानाचा अनुभव शांत, आरामदायी आणि आनंददायी करण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर परिश्रम घेतल्याचेही म्हटले.

पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदानपहिल्या टप्प्यात उद्या, म्हणजेच 19 एप्रिल रोजी देशातील 102 लोकसभा मतदारसंघ (जनरल- 73; ST-11; SC-18) आणि 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 92 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. अरुणाचल आणि सिक्कीममध्ये विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. यामध्ये सर्व टप्प्यांच्या तुलनेत संसदीय मतदारसंघांची संख्या सर्वाधिक आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजता संपेल. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 1.87 लाख मतदान केंद्रे तयार असून, 18 लाखांहून अधिक मतदान अधिकारी सज्ज आहेत. उद्या, 16.63 कोटींहून अधिक मतदार 1625 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष, 8.23 ​​कोटी महिला आणि 11,371 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 

1625 उमेदवार निवडणूक रिंगणातपहिल्या टप्प्यात 1625 उमेदवार (पुरुष 1491; महिला 134) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 41 हेलिकॉप्टर, 84 विशेष गाड्या आणि सुमारे 1 लाख वाहने तैनात करण्यात आली आहेत. निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक निर्णायक पावले उचलली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मतदान केंद्रांवर पुरेसा केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 50 टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल. सूक्ष्म निरीक्षकांच्या तैनातीसोबतच सर्व मतदान केंद्रांवर 361 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 127 जनरल पर्यवेक्षक, 67 पोलीस पर्यवेक्षक आणि 167 आर्थिक पर्यवेक्षक असतील. 85 वर्षांवरील दिव्यांग मतदारांसाठी पिक अँड ड्रॉप सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधामुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावर बांधण्यात आले असून तेथे पिण्याचे पाणी, शौचालय, शेड, रॅम्प, व्हीलचेअर, हेल्प डेस्क आणि मतदारांसाठी स्वयंसेवक असतील. मतदारांना त्यांच्या निवासस्थानी मतदार माहितीच्या स्लिपही पाठवण्यात आल्या आहेत. राजीव कुमार यांनी उन्हाळ्याची तीव्रता पाहता सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, भारतीय मतदारांचा उत्साह उष्णतेवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग