शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 07:52 IST

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं स्वतःच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली- येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात छत्तीसगडमधील 77, तेलंगणातल्या 38 आणि मिझोरममधल्या 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती(सीईसी)च्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.छत्तीसगडमध्ये 90, तेलंगणात 119 आणि मिझोरम विधानसभेच्या एकूण 40 जागांवर या निवडणुका होत आहेत. शनिवारी पक्षाच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर केली. या सीईसीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.छत्तीसगडमधल्या भाजपाच्या पहिल्या यादीत 14 महिलांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच भाजपानं छत्तीसगडमधल्या इतर 25 जागांवरून 40 वर्षांखालील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अनुसूचित जातीच्या 29 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. 12 नोव्हेंबरला छत्तीसगडच्या 18 जागांसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार असून, त्याचा निकाल 11 डिसेंबरला येणार आहे.  भाजपानं या 18 जागांपैकी 17 जागांवरच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात बस्तरच्या 12 आणि राजनांदगावच्या 6 जागांवर मतदान होणार आहे. विशेष म्हणजे आयएएस अधिकारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये सक्रिय झालेल्या ओ. पी. चौधरी यांनाही खरसिया जागेवरून भाजपानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तसेच मुख्यमंत्री रमण सिंह राजनांदगाव आणि छत्तीसगड भाजपाध्यक्ष बिलहा या विधानसभांच्या जागांवरून निवडणूक लढणार आहेत.त्याबरोबरच भरतपूर-सोनहत मतदारसंघातून चंपादेवी पावले, मनेंद्रगडमधून श्याम बिहारी जयस्वार, बैकुंठपूरमधून भैय्यालाला रजवाडे, प्रतापपूर मतदारसंघातून राजसेवक पॅकरा, सामरी मतदारसंघातून सिद्धनात पॅकरा, लुंड्रातून विजयनाथ सिंह, अंबिकापूरमधून अनुराग सिंहदेव, कुनकुरीतून भरत साय, रायगड मतदारसंघातून रोशनलाल अग्रवाल आणि सारंगडमधून केराबाई मनहर हे उमेदवार मैदानाच्या रिंगणात आहे.  तेलंगणातही भाजपानं 38 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे, त्यात तीन महिलांनाही स्थान देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018