शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:45 IST

खासगी भागीदारीने विशेष सेवा : भाजी, फळांच्या वाहतुकीची ‘एसी’; घोषणा झाली होती अर्थसंकल्प मांडताना

नवी दिल्ली : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा शुक्रवारपासून सुरू होत असून अशी पहिली गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल. नाशिवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकुलित वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंंकल्प मांडताना केली होती. या रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकुलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध होईल. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीतील ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवानाकरतील.

भारतीय रेल्वेने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले की, पहिली ‘किसान रेल’ गाडी ७ आॅगस्ट रोजी देवळाली येथून सकाळी ११ वाजता रवाना होईल व १,५१९ किमीचे अंतर ३१ तास ४५ मिनिटांत कापून शनिवारी (८ आॅगस्ट) सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. ही ‘किसान रेल’ गाडी आठवड्यातून एक दिवस चालविली जाईल. वाटेत ती नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुºहाणपूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पं. दीनदयाल उपाध्याय नगर व बक्सर येथे थांबून दानापूरला जाईल.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे.नाशिक जिल्हा आणि परिसरात ताज्या भाज्या, फळे, फुले, कांदे व अन्य नाशिवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना हा परिसर ‘किचन गार्डन’ म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरांखेरीज अन्य राज्यांमध्ये पाटणा, अलाहाबाद, कटनी, सतना इत्यादी ठिकाणी पाठविला जातो.या गाडीने माल पाठविण्यासाठी प्रतिटन मालभाडे आकारणी अशी असेल: नाशिक रोड/ देवळाली ते दानापूर-रु. ४,००१. मनमाड ते दानापूर-रु. ३,८४९. जळगाव-दानापूर-रु. ३,५१५ आणि भुसावळ ते दानापूर-रु. ३,४४९.दशकापूर्वीची कल्पनाच्नेहमीच्या मालगाड्यांना ‘रेफ्रिडरेटेड पार्सल व्हॅन’ जोडून त्यातून नाशिवंत मालाची अशा प्रकारे वाहतूक करण्याची पहिली कल्पना माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सन २००९-१० च्या रेल्वे अर्थसंंकल्पात मांडली होती; पण ती कधी प्रत्यक्षात उतरलीच नाही. याआधी रेल्वने केळ्यासारख्या एकाच नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी विशेष मालगाड्या चालविल्या होत्या.च्विविध प्रकारच्या नाशवंत मालांसाठी एकत्रित अशी गाडी प्रथमच चालविण्यात येत आहे. याशिवाय ‘कन्टेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’च्या (सीसीआय) ‘सीएसआर’ निधीतून रेल्वेने उत्तर प्रदेशात गाझीपूर घाट व राजा का तालाब आणि दिल्लीत न्यू आझादपूर येथे नाशवंत मालासाठी तापमान नियंत्रित केलेली ‘कार्गो सेंटर’ सुरु केली. नशिक जिल्ह्यात लासलगाव येथेही अशीच एक योजना प्रगतिपथावर आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे