शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 14:04 IST

Coronavirus Vaccine : पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राला झाली सुरूवात. शनिवारी करण्यात आलं उद्घाटन.

ठळक मुद्देपहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राला झाली सुरूवात.शनिवारी करण्यात आलं उद्घाटन.

सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत यावर लसीकरण हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. दरम्यान, १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणालाही सुरूवात झाली. अशातच मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राची सुरूवात करण्यात आली. भोपाळ श्यामला हिल्स परिसरात उभारण्यात आलेल्या मध्यप्रदेश टुरिझ्मच्या ड्राईव्ह इन सिनेमा येथे या लसीकरण केंद्राची सुरूवात करण्यात आली. शनिवारी याचं उद्घाटन करण्यात आलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रावर शनिवारी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हे लसीकरण केंद्र सुरक्षित आणि अनोखा प्रयोग आहे. याप्रकारचे नवे प्रयोग अन्य ठिकाणीही केले जातील, असं सारंग म्हणाले. या नव्या योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी ९५ जणांचं लसीकरण करण्यात आली. लसीकरण झाल्यानंतर संबंधितांना अर्ध्या तासाकरिता याच परिसरात थांबावं लागेल. यादरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या पडद्यावर माहिती दिली जाईल. या ठिकाणी रोज संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना या ठिकाणी लस दिली जाईल. यासाठी पूर्ण नोंदणी केली असणं आवश्यक आहे. पिकअप ड्रॉप सेवा उपलब्ध"या लसीकरण केंद्रांसाठी पिकअप आणि ड्रॉपची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे १० किलोमीटरसाठी ४०० रूपये, २० किलोमीटरसाठी ६०० रूपये आणि ३५ किलोमीटरसाठी ९०० रूपये शुल्क द्यावं लागेल. ही सेवा घेणाऱ्या नागरिकांना एमपी टुरिझ्मद्वारे त्यांच्या घरातून घेऊन लस घेतल्यानंतर पुन्हा घरापर्यंत सोडलं जाईल," अशी माहिती एमपी टुरिझ्मचे व्यवस्थापकीय संचालक एस. विश्वनाथन यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMadhya Pradeshमध्य प्रदेशbhopal-pcभोपाळcarकार