शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विधानसभा निवडणूक होणाऱ्या ५ राज्यांत ९.४८ कोटी लोकांना पहिला डोस; सर्व प्रौढांचे जानेवारीपर्यंत लसीकरणाचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:12 AM

अशा पार्श्वभूमीतही केंद्र सरकार उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांतील सर्व प्रौढ लोकांचे पूर्णत: लसीकरण करण्यास प्राधान्य देऊ शकते.

हरीश गुप्ता -नवी दिल्ली :  कोविशिल्ड लसीचे २२ कोटी डोस आणि कोव्हॅक्सिनचे ५.५ कोटी डोस तसेच स्पुटनिक-व्ही लसीचे काही लाख डोस यासह  विधानसभेची निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांतील संपूर्ण प्रौढ लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे.  भारतीय लसीचे उत्पादन वाढविण्यात येत असले, तरी ऑक्टोबर महिन्यातील ३० कोटी डोसच्या लक्ष्यपूर्तीसाठी पुरवठ्याचे प्रमाण अद्यापही कमीच आहे.

तथापि, अशा पार्श्वभूमीतही केंद्र सरकार उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांतील सर्व प्रौढ लोकांचे पूर्णत: लसीकरण करण्यास प्राधान्य देऊ शकते.

या पाच राज्यांतील प्रौढांची एकूण संख्या  २०११ च्या जनगणनेेनुसार २९ कोटी आहे. यापैकी १७ कोटी ४० लाख लोक १८ वर्षांवरील असून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या अंदाजे १३ कोटी १० लाख आहे. या पाच राज्यांतील ९ कोटी ४८ लाख लोकांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. पुढच्या दोन महिन्यांत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लोकांना प्राधान्याने आणि निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधी जानेवारीपर्यंत या पाच राज्यांतील सर्व प्रौढांचे लसीकरण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. 

गोवा राज्याने बारा लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस  आणि ६ लाख लोकांना दोन्ही डोस देऊन आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचा दावा केला आहे.केंद्र सरकारने ७ ऑक्टोबरपर्यंत शंभर कोटी डोसचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने  सुरू केलेल्या २० दिवसांच्या  जनसेवा अभियानाची सांगताही ७ ऑक्टोबर रोजी होणार असून हेच औचित्य साधून सरकारने लक्ष्य निश्चित केले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक