दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 02:31 AM2020-10-13T02:31:22+5:302020-10-13T02:31:44+5:30

वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे

First day inconvenient at Delhi University; OBC certificate required for the current financial year | दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे

दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे

Next

एस. के. गुप्ता

नवी दिल्ली : दिल्लीविद्यापीठात प्रवेशाच्या पहिल्या दिवशी ८० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी असे होते की, त्यांचा पहिल्या प्रवेश कटऑफमध्ये नंबर येऊनही प्रवेश झाला नाही. या विद्यार्थ्यांचे गुण ९३ ते १०० दरम्यान आहेत. विद्यार्थी सकाळी नऊपासूनच दस्तावेज स्कॅन करून संगणकावर ते अपलोड करू लागले आणि सायंकाळी उशिरापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल याची वाट पाहात संगणकासमोर बसून राहिले. ज्यांना उत्तर मिळाले ते आनंदी होते.

विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमिक परिषदेचे सदस्य डॉ. सुधांशु कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे, चालू आर्थिक वर्षाचे नाही. मिरांडा महाविद्यालयात बीकॉमसाठी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीने म्हटले की, मी सकाळपासून संगणकासमोर बसून आहे. दुपारी तीनपर्यंत मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे उत्तर मिळाले नाही.

डॉ. सुधांशु म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षीपर्यंत ऑफलाइन दस्तावेजांचे सत्यापन केले जात असताना जर कोणत्याही विद्यार्थ्याचे ओबीसी प्रमाणपत्र गेल्या वर्षीचे असेल तर त्याला चालू आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आणण्यासाठी काही वेळ देऊन तात्पुरता प्रवेश दिला जात होता. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून न घेता त्यांचा अर्ज नाकारणे योग्य नाही. मी विद्यापीठाच्या प्रशासनालाही याबाबत पत्र लिहिले आहे.’’

ई मेल करावा
विद्यापीठाने शनिवारी रात्री पहिला प्रवेश कटऑफ जारी केला. पहिल्या कटऑफमध्ये येणाºया विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी आॅनलाइन दस्तावेज व १६ ऑक्टोबरपर्यंतफी जमा करावी. आॅनलाईन डॉक्युमेंटच्या सत्यापनाला थोडा वेळ लागेल. काही तक्रार असेल तर त्यांनी डीन स्टुडंट वेल्फेअर कार्यालयाला ई-मेल करावा. - प्रो. राजीव गुप्ता, डीन स्टुडंट वेल्फेअर, दिल्ली विद्यापीठ

Web Title: First day inconvenient at Delhi University; OBC certificate required for the current financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.