शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हम है जोश मे.... भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टर दाखल, ड्रॅगन अन् पाकची झोप उडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 15:42 IST

भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत.

नवी दिल्ली- भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी या विमानांसाठी अमेरिकेबरोबर करार करण्यात आला होता. अखेर  भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. गुजरातमधल्या मुद्रा विमानतळावर 4 चिनूक हेलिकॉप्टर्स पोहोचली आहेत.सप्टेंबर 2015मध्ये भारताची बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2017ला संरक्षण मंत्रालयानं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरसह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला 4168 कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती.  अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचा वापर कित्येक देश करतात. चिनूकचा वापर करणारा भारत हा 19 वा देश ठरणार आहे.2018मध्ये बोइंगने भारतीय वायुदलाच्या 4 वैमानिक तसेच 4 फ्लाइट अभियंत्यांना चिनूक हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले होते. अमेरिकन लष्कर जेव्हा युद्धावर असते तेव्हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे मेडिकल आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पुरवणे असा विविध गोष्टींसाठी चिनूकचा वापर केला जातो. अत्यंत वेगवान तितकेच चपळ असलेले हे हेलिकॉप्टर जगातले सर्वात ताकदवान चॉपर असल्याचे मानले जाते. चिनूक हेलिकॉप्टरची ताकद जगातल्या सर्वच देशांच्या लष्कराला परिचित आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाई करणाऱ्या देशांना गरज पडल्यास चिनूक हेलिकॉप्टरची ताकद दाखवून देता येणार आहे. 

टॅग्स :airforceहवाईदल