शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आतषबाजीमुळे दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; शेतकऱ्यांचेही महामार्गावर आंदाेलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 08:03 IST

सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर

नवी दिल्ली : सर्वाेच्च न्यायालयाने यावर्षी फटाकेबंदीबाबत अतिशय कठाेर निर्देश दिले हाेते. मात्र, न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून देशभरात माेठ्या प्रमाणावर फटाके फाेडण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय धाेकादायक पातळीवर आली आहे. तर आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अजूनही महामार्ग माेकळे केलेले नाहीत.

सर्वाेच्च न्यायालयाने फटकेबंदीसंदर्भात आदेश देताना सर्व राज्यांचे मुख्य सचिव, पाेलीसदल प्रमुख, पाेलीस आयुक्त, पाेलीस अधीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाईचा इशारा दिला हाेता. न्यायालयाने सरसकट फटाकेबंदी घातली नव्हती. मात्र, ग्रीन क्रॅकरला परवानगी दिली हाेती. तर दिल्ली सरकारने सरसकट फटाकेबंदी घातली हाेती. तरीही दिल्लीसह देशभरात माेठ्या प्रमाणावर आतषबाजी झाली. त्यामुळे दिल्लीकरांना वायुप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. दिल्लीत जनपथ, गाझियाबाद, नाेयडा इत्यादी ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक धाेकादायक श्रेणीत पाेहाेचला. जनपथ येथे ६५५.०७ एवढी पीएम २.५ पातळी पाेहाेचली हाेती. रविवारपर्यंत यात सुधारणा हाेण्याची शक्यता नाही. 

न्यायालयाच्या आदेशानंतरही महामार्ग बंदच

सर्वाेच्च न्यायालयाने शाहीन बाग आंदाेलनप्रकरणी रस्ता माेकळा करण्याचे निर्देश दिले हाेते. आंदाेलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. मात्र, रस्ते आणि मार्ग राेखून आंदाेलन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले हाेते.  त्याचप्रकारे दिल्लीच्या सीमेवर आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्यायालयाने आदेश दिले हाेते. मात्र, संयुक्त किसान युनियनने याप्रकरणी न्यायालयात उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी अजूनही महामार्गावर आंदाेलन करीत आहेत.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण