शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 09:01 IST

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली.

पंजाबमधील अग्निवीर जवानाला जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर वीरमरण आले. मात्र, अग्निवीर भरतीच्या नवीन नियमावलीनुसार या जवानास शहीद दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे, अंत्यसंस्कारावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात न आल्याने कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली. त्यावर, आता सैन्य दलाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा मृत्यू स्वत: गोळी झाडून घेतल्याने झाला. त्यामुळे, नवीन नियमावलीनुसार त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही किंवा कुठलाही शहीद जवानांवरील सोपस्कार करण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण सैन्य दलाकडून देण्यात आले आहे. 

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू असल्याचंही सैन्याने म्हटलं आहे. अग्निवीर अमृतापल सिंह यांचे पार्थिव एका भाडे तत्त्वावरील रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आले. त्यावेळी, एक ज्युनियर कमीशंड अधिकारी व इतर ४ जवान पार्थिसवासोबत होते. मात्र, अंत्यसंस्कारावेळी हे जवानही उपस्थित नसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्यामुळे, अग्निवीर अमृतपाल सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली. 

याप्रकरणावरुन पंजाबमधील राजकीय नेत्यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केंद्र सरकारला याप्रकरणी जाब विचारणार असल्याचं म्हटलं आहे. अमृतपाल सिंह यांच्या बलिदानासाठी सैन्याची नियमावली काहीही असो, मात्र आमचं सरकार शहीदांचा तोच सन्मान, स्मरण करेल. त्यानुसार, जवानाच्या कुटुंबीयांस १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. अमतृपाल सिंह हे देशाचे शहीद जवान आहेत, असे ट्विट भगवंत मान यांनी केले आहे.  शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही अमृतपाल यांच्या मृत्यूनंतर सैन्य दलाकडून न मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरमुळे नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष घालून सर्वच शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर दिला जावा, अशी मागणी केली आहे.  

दरम्यान, अमृतपाल सिंह हे पुँछ सेक्टरमधील जम्मू-काश्मीर रायफल्सच्या एका बटालियनमध्ये कार्यरत होते. शुक्रवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

टॅग्स :MartyrशहीदAgneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर