शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या फॅक्ट्रीतील स्फोटानंतर मालक फरार; शेजाऱ्यांची घरावर बुलडोझर फिरवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:15 IST

Harda Blast : मुख्य बाजारपेठेत फॅक्ट्री मालकाचे तीन मजली घर आहे. त्याच्या घरावर देखील फटाक्यांची मोठी जाहिरातही लावण्यात आली आहे. या घटनेनंतर राजेश अग्रवालचं संपूर्ण कुटुंब फरार आहे.

मध्य प्रदेशच्या हरदा येथील फटाक्यांच्या फॅक्ट्रीतील स्फोटानंतर फटाका फॅक्ट्रीचा मालक राजेश अग्रवालचं घर बुलडोझरने पाडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत फॅक्ट्री मालकाचे तीन मजली घर आहे. त्याच्या घरावर देखील फटाक्यांची मोठी जाहिरातही लावण्यात आली आहे. या घटनेनंतर राजेश अग्रवालचं संपूर्ण कुटुंब फरार आहे.  राजेश अग्रवालने घरातच गोडाऊन बनवून फटाक्यांचा साठा करून ठेवल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे, त्यामुळेच परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राजेश अग्रवालचं घर बुलडोझरने पाडण्याची मागणी शेजाऱ्यांनी केली आहे. फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर अग्रवाल कुटुंबातील लोक घराला कुलूप लावून कुठेतरी निघून गेले आहेत.

प्रशासनाने अद्याप आरोपीचं घर तपासासाठी सील केलेलं नाही. घरातील सदस्य निघून गेल्याने घराला कुलूप आहे. घरातही फटाके असल्याचं शेजाऱ्यांचं म्हटलं आहे. हरदा शहरात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर 174 जण जखमी झाले. लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली.

नर्मदापुरम विभागाचे आयुक्त पवन शर्मा य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 174 जणांना घटनास्थळावरून वाचवण्यात यश आले असून, त्यापैकी 34 जणांना भोपाळ आणि होशंगाबादला पाठवण्यात आले आहे, तर 140 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेफर करण्यात आलेल्या लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला असून जिल्हा रुग्णालयात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश