शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:50 IST

केरळच्या अझिककल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज 'एमव्ही वान हाय ५०३'मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे ...

केरळच्या अझिककल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज 'एमव्ही वान हाय ५०३'मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीतून आतापर्यंत १८ क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवण्यात आले असून, ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे पथक बचाव व अग्निशमन कार्यात पूर्ण क्षमतेने सहभागी झाले आहे.

भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, “स्फोट आणि आग मुख्यतः जहाजाच्या मध्यभागी व निवास ब्लॉकच्या समोरील कंटेनरमध्ये होत आहेत. जहाजाच्या पुढील भागातील आग काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी, तिथून अजूनही दाट धुराचे लोट बाहेर येत आहेत. जहाज सध्या बंदराच्या दिशेने सुमारे १०-१५ अंश झुकले आहे आणि काही कंटेनर्स समुद्रात कोसळल्याचेही निदर्शनास आले आहे.”

भारतीय नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन

कोची येथून दाखल झालेले 'आयसीजी समर्थ' आणि समुद्र प्रहारी व सचेत अशी इतर जहाजे या संकटकाळात आग विझवणे आणि जहाजाच्या भागांची शीतकरण करण्याची प्रक्रिया करत आहेत. या बचाव मोहिमेत भारतीय नौदलाची आयएनएस सुरत ही युद्धनौका देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

नेमकं झालं काय?

ही दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. कन्नूर येथील अझिककल किनाऱ्यापासून सुमारे ४४ नॉटिकल मैलांवर असताना या मालवाहू जहाजातील एका कंटेनरमध्ये स्फोट झाला. काही वेळातच आगीने तीव्र रूप धारण केल्याने कर्मचाऱ्यांना तातडीने जहाज सोडावे लागले.

एमव्ही वान हाय ५०३ हे मालवाहू जहाज श्रीलंकेच्या कोलंबो बंदरातून भारताच्या न्हावा शेवा बंदराकडे जात होते. स्फोटानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी लाईफ राफ्ट्सचा वापर करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आयएनएस सुरतच्या मदतीने त्यापैकी १८ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढून सोमवारी संध्याकाळी मंगलोर बंदरात आणण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू असून, बेपत्ता चार सदस्यांचा शोध अद्याप सुरू आहे. पुढील अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातInternationalआंतरराष्ट्रीय