शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमध्ये निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:11 IST

Fire at Bullet Train Station : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 

Fire at Bullet Train Station : अहमदाबादमधील निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग लागली. ही आगीची घटना शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आग सकाळी ६.३० वाजता लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला दोन तासांहून अधिक वेळ लागला. दरम्यान, या आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनचा मोठा भाग आगीने वेढल्याचे व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे. तसेच, या घटनेवर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (NHSRLC)  एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

बांधकाम सुरू असलेल्या स्टेशनच्या एका भागात छताच्या शटरिंगमध्ये आग लागल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, वेल्डिंग स्पार्कमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तपासात स्पष्ट कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

साबरमती हे स्टेशन ५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पात गुजरात (३५२ किमी) आणि महाराष्ट्र (१५६ किमी) यांचा समावेश आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात  मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, नडियाड, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ स्थानके नियोजित आहेत.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनfireआगGujaratगुजरात