शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; तरुणाच्या हत्येप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 11:49 IST

आजीच्या वर्षश्राद्धाचं सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या

पाटणा: बिहारमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 150 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीतामढी जिल्ह्यातील एक तरुण आजीच्या वर्षश्राद्धासाठी सामान आणायला जात होता. त्यावेळी जमावानं त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सीतामढीमधील सिगंहरिया गावचा रहिवासी रुपेश झा त्याच्या आजीच्या वर्षश्राद्धाचं सामान आणण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक मित्रदेखील होता. सामान आणायला जात असताना पिक-अपच्या चालकासोबत त्याचा वाद झाला. यानंतर त्याठिकाणी मोठी गर्दी जमली. जमावानं कोणताही विचार न करता रुपेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेकांनी रुपेशला काठ्यांनी जबर मारहाण केली. रुपेशनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावानं मारहाण सुरूच ठेवली. काही वेळानं स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुपेश गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुपेशची प्रकृती गंभीर असल्यानं कुटुंबीयांनी त्याला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर वरुण कुमार यांच्या क्लिनिकमध्ये नेलं. मात्र रुपेशची प्रकृती अतिशय नाजूक असल्यानं वरुण कुमार यांनी त्याला पीएमसीएचमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला.  

टॅग्स :LynchingलीचिंगBiharबिहार