शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 'खेल खत्म, फुटेज हजम'; योगेंद्र यादवांची केजरीवालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:40 IST

अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांनी धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले.आंदोलनावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले जुने सहकारी योगेंद्र यादव यांच्या सुद्धा हल्लाबोल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्याच्या मंत्रिमंडळातील सहका-यांनी केलेले धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले. अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

योगेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, खेळ संपला, फुटेज खाल्ल. गेल्या दहा दिवसांत या नाटकामुळे दिल्लीतील जनतेला काय मिळाले? मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना अपील केले की, अधिका-यांची आणि मंत्र्यांची बैठक ठरली आहे. नायब राज्यपालांनी ही बैठक बोलविली आहे का? संप मोडला? रेशन डिलिव्हरीच्या मागणीचे काय झाले? या ठिकाणी पब्लिसिटी जास्त झाली. अजून काय पाहिजे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या नऊ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी सुरू असलेले आपले आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर केजरीवालांनी हा निर्णय घेतला. 

अरविंद केजरीवाला यांच्या धरणे आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण तापले होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वारंवार मागणी करूनही राज्यपाल अनिल बैजल प्रतिसाद देत नसल्यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी हे आंदोलन पुकारले होते. या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री 11 जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले होते.

या आंदोलनादरम्यान  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यांनी पाठिंबा दिल्यामुळे केजरीवालांची बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे अनिल बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता. अखेर त्यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाची दखल घेत चर्चेची तयारी दाखविली. त्यानंतर केजरीवालांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालYogendra Yadavयोगेंद्र यादवkumarswamyकुमारस्वामीMamata Banerjeeममता बॅनर्जीdelhiदिल्ली