फिनाईल पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न
By admin | Updated: January 19, 2016 23:04 IST
जळगाव: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या तोंडात जबरदस्तीने फिनाईल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती कैलास काळू सपकाळे, सासू वत्सलाबाई सपकाळे , मनिलाल काळू सपकाळे व विलास काळू सपकाळे (सर्व रा.धामणगाव) या चौघांविरुध्द मंगळवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिनाईल पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न
जळगाव: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या तोंडात जबरदस्तीने फिनाईल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती कैलास काळू सपकाळे, सासू वत्सलाबाई सपकाळे , मनिलाल काळू सपकाळे व विलास काळू सपकाळे (सर्व रा.धामणगाव) या चौघांविरुध्द मंगळवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामणगाव येथे घराशेजारी वाढदिवसानिमित्त सोमवारी कीर्तन व जेवणाचा कार्यक्रम असल्याने पीडित विवाहिता ही रात्री अकरा वाजता जेवण करून घरी आली असता पती कैलास याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीशी वाद घातला. हा प्रकार पाहून त्यांच्या मुलाने आजी वत्सलाबाई यांना कीर्तनमधून बोलावून आणले. तेव्हा दोघांनी तिला मारहाण केली.पतीने जमिनीवर पाडून तिचा गळा दाबून धरला तर सासुने तोंडात फिनाईल ओतले. दरम्यान, याआधीही चौघांनी घर घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी छळ केला होता. उपनिरीक्षक वंदना सोनुने तपास करीत आहेत.