शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन निर्णयाच्या आर्थिक परिणामांचा होणार अभ्यास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:20 IST

निती आयोग : ‘सीयूटीएस’ संस्थेकडे सोपविली जबाबदारी

नवी दिल्ली : विविध न्यायालये आणि अर्धन्यायिक संस्थांचे निर्णय आणि सक्रियता यामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्याचे आदेश निती आयोगाने जयपूर येथील संशोधन संस्था ‘कंझ्युमर युनिटी ॲण्ड ट्रस्ट सोसायटी’ (सीयूटीएस)ला दिले आहेत.निती आयोगाने जारी केलेल्या अभ्यासविषय टिपणानुसार, सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालये आणि राष्ट्रीय हरित लवादासारख्या अर्धन्यायिक संस्था यांच्याकडून विविध विकासकामे व प्रकल्पांसंदर्भात देण्यात येणाऱ्या निर्णयाचे व्यापक आर्थिक परिणाम होतात. अशा प्रकरणात अनेकदा न्यायालयीन सक्रियताही दिसून येते. त्यामुळे प्रकल्प रखडतात. त्यांचा खर्च वाढतो. नेमका त्याचाच अभ्यास करण्यात येणार आहे.वास्तविक, हा अभ्यास फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू होऊन या महिन्याच्या अखेरीस संपणार होता. तथापि, लॉकडाऊनमुळे तो रखडला. त्याला मुदतवाढ देण्यासाठी ‘सीयूटीएस’ने आता निती आयोगाकडे अर्ज केला आहे.  या प्रकल्पाचा प्रारंभिक खर्च २४.८ लाख रुपये होता. सूत्रांनी सांगितले की, न्यायमूर्तींच्या कामगिरीचा लेखाजोखा ठेवण्यासाठी ‘न्यायालयीन कामगिरी निर्देशांक’ निश्चित करण्याचा व्यापक प्रकल्प निती आयोगाने होती घेतला आहे. त्या अंतर्गत हा अभ्यास करण्यात येणार आहे.टिपणीत म्हटले आहे की, या अभ्यासाचा संपूर्ण खर्च निती आयोग उचलणार आहे. आपल्या निर्णयांचे व्यापक आर्थिक परिणाम होतात, याची जाणीव न्यायव्यवस्थेला करू द्यावी, त्याबाबत न्यायव्यवस्थेला संवेदनशील बनवावे, यासाठी हा अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष व्यावसायिक न्यायालये, हरित लवाद, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांसाठी प्रशिक्षण साहित्य म्हणून वापरले जाईल.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोग