शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: सलाम! वडिलांचं निधन होऊनही अधिकाऱ्यानं पूर्ण केलं बजेटचं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:01 IST

अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याची कर्तव्यनिष्ठा

नवी दिल्ली: काही व्यक्ती कामाला अतिशय प्राधान्य देतात. आधी काम आणि नंतर बाकी सगळं, अशी त्यांची मानसिकता असते. शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे अशा अतिशय समर्पित भावनेनं काम या व्यक्ती काम करतात. त्यामुळे त्यांच्या हातून घडणारं कामदेखील अनन्यसाधारण असतं. अशाच एका व्यक्तीचं अर्थ मंत्रालयानं कौतुक केलं आहे. अर्थ मंत्रालयानं ट्विट करून कुलदीप कुमार शर्मा यांनी दाखवलेल्या कामावरील निष्ठेची तोंडभरुन स्तुती केली आहे. शर्मा अर्थ मंत्रालयाच्या छपाई विभागात उपव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. शर्मा अर्थसंकल्पाच्या छपाईच्या कामात व्यस्त असताना २६ जानेवारीला त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्र तरीही त्यांनी आपलं काम सुरुच ठेवलं. अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम सुरू असताना त्यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतरच त्यांना बाहेर पडता येतं. अर्थ मंत्रालयानं कुलदीप कुमार शर्मा यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं ट्विटरवर कौतुक केलं आहे. 'आम्हाला हे कळवताना अतिशय दु:ख होतंय की छपाई विभागाचे उपव्यवस्थापक श्री कुलदीप कुमार शर्मा यांच्या वडिलांचं २६ जानेवारी २०२० रोजी निधन झालं. मात्र अर्थसंकल्पाचं काम करत असल्यानं त्यांना बाहेर जाणं शक्य नव्हतं. आपले वडील गमावूनही शर्मा एक मिनिटदेखील छपाई विभागाच्या बाहेर गेले नाहीत,' अशा शब्दांत अर्थ मंत्रालयानं शर्मा यांच्या समर्पित भावनेची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे. थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यानंतर कुलदीप यांना बाहेर पडता येईल. अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया साधारणत: सप्टेंबरपासून सुरू होते. ही प्रक्रिया जवळपास सहा महिने चालते. तर अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम हलवा सेरेमनीनंतर सुरू होतं. हलवा सेरेमनी झाल्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी अर्थ मंत्रालयातच राहतात. त्यांना बाहेर पडण्याची परवानगी नसते. 

टॅग्स :budget 2020बजेट