शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीच म्हणतात, मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 15:47 IST

अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट असल्यानंच प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा

नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था संकटात असून त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारकडे नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी एका लेखात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलायला हवीत, असं प्रभाकर यांनी 'द हिंदू' वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. प्रभाकर हैदराबादमधील राईट फोलियो नावाच्या खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. 'भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. परंतु समोर येणाऱ्या आकडेवारीतून अर्थव्यवस्थेसमोरील संकट दिसून येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे,' असं प्रभाकर यांनी लिहिलं आहे. घटलेला जीडीपी आणि त्यामुळे गेलेल्या नोकऱ्या याची आकडेवारीदेखील त्यांनी लेखात दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे, असं प्रभाकर यांनी म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे काही ठोस रणनीती आहे असं मला वाटत नाही. भाजपाच्या नेतृत्त्वाला याची कल्पना असल्यानंच त्यांनी अर्थव्यवस्थेचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत उपस्थित केला नाही. त्याऐवजी त्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा हेच विषय केंद्रस्थानी ठेवले, अशा शब्दांमध्ये प्रभाकर यांनी भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील रणनीतीचं विश्लेषण केलं.  नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत, हे भाजपा नेतृत्त्वानं निश्चित केलं आहे. अर्थव्यवस्था संकटात असण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही, असं प्रभाकर यांनी लेखात म्हटलं आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू