अर्थसंंकल्प, शेतकरी, सर्वसामान्य
By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST
सर्वसामान्यांना दिलासा
अर्थसंंकल्प, शेतकरी, सर्वसामान्य
सर्वसामान्यांना दिलासाया अर्थसंकल्पात कार महाग करण्याचा व सेवा कराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेऊन सरकारने सर्वसामान्यांना दिलासा व श्रीमंतांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्यांनाही दिलासा दिला आहे. एक कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंडळीच्या सरचार्जमध्ये वाढ केली जाणार आहे. ग्रामविकासासाठी ९७ हजार कोटींची तरतूद केली. शेतीसाठी ३५ हजार ९८४ कोटींची तरतूद केली आहे. पीक विमा योजनेसाठी पाच हजार ५०० कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे. एकात्मीक शेती, शेतमालाचे मार्केटींग यावरही भर दिला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामावेशक आहे. -डॉ.एस.डी.पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख, नूतन मराठा महाविद्यालयबँकांना तूटमहाबँक, विजया व महाराष्ट्र बँक नफ्यात आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकांनी तूट दाखविली आहे. पंजाब व कॅनरा बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. शेतीसाठी मात्र अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. बँका तोट्यात आहेत याचा अर्थ त्यांची वसुली नाही. राष्ट्रीयकृत बँका जर तोटा दाखवायला लागल्या तर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे हे स्पष्ट होते. -पानाचंद उत्तम चौधरी, सर्वसामान्य नागरिक