शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 17:08 IST

'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट गुजरातमधील गोध्रा दंगलींवर आधारित आहे.

PM Narednra Modi on The Sabarmati Report: अभिनेता विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गुजरातच्या गोध्रा दंगलीवर आधारित या चित्रपटाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाबाबत पीएम मोदींनी पोस्ट केली असून, सत्य सर्वांसमोर येतेच, असे त्यांनी लिहिले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून आलोक भट्ट नावाच्या युजरची एक्स पोस्ट शेअर केली आहे. गोध्रा घटनेवर बनवलेल्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलरही या पोस्टसोबत जोडण्यात आला आहे. रिपोस्ट करताना पीएम मोदींनी लिहिले की, "सत्य समोर येत आहे, ही चांगली गोष्टी आहे. सामान्य लोकही ते पाहू शकतील. बनावट गोष्टी काही काळासाठी दाखवता येतात, पण तथ्ये नेहमीच बाहेर येतात," असे पीएम मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट का पाहावा? हे या पोस्टमधून सांगितले आहे. 

1. हा प्रयत्न प्रशंसनीय आहे. अलीकडील इतिहासातील सर्वात लज्जास्पद घटनांपैकी एक, याचे सत्य ते समोर आणते.2. निर्मात्यांनी चित्रपटातील संवेदनशील मुद्दे अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत आणि तितक्याच प्रामाणिकपणे तो बनवला आहे.3. साबरमती एक्स्प्रेसच्या प्रवाशांना जाळण्याच्या या घृणास्पद घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न कसा केला गेला, याचा सखोल विचार करणे आपल्या सर्वांसाठी गरजेचे आहे.4. शेवटी, 59 निष्पाप पीडितांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळाली. हा चित्रपट खरोखरच त्या 59 निष्पाप पुरुष, स्त्रिया आणि बालकांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी त्या दिवशी आपला जीव गमवला होता. 

'द साबरमती रिपोर्ट' गोध्रा घटनेवर आधारित दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

त्या दिवशी काय घडले?गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून साबरमती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कारसेवकांच्या बोगीला आग लागली. या हृदयद्रावक घटनेत 59 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच्या एका दिवसानंतर, 28 फेब्रुवारीपासून गुजरातमध्ये भीषण जातीय दंगली घडल्या, ज्यात सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. गोध्रा घटनेच्या वेळी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbollywoodबॉलिवूडGujaratगुजरातVikrant Masseyविक्रांत मेसी