शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

D. K. Shivakumar: मुख्यमंत्री न बनू शकल्याच्या मुद्द्यावर अखेर डी. के. शिवकुमार यांनी सोडलं मौन, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 23:29 IST

D. K. Shivakumar: मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची सल शिवकुमार यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर डी.के. शिवकुमार आणि सिद्धारमैय्या यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच झाली. यामध्ये अखेर सिद्धारमैय्या यांनी बाजी मारली होती. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची सल शिवकुमार यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. गांधी कुटुंबीय आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सल्ल्यानंतर मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलो आणि संयम पाळण्याचा निर्णय घेतला.

उपमुख्यमंत्री बनल्यानंतर आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेलेल्या शिवकुमार यांनी मतदारांना सांगितले की, मला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची तुमची इच्छा कधी खोटी ठरणार नाही. तुम्ही केवळ संयम पाळा. तुम्ही मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं होतं.  मात्र काय करणार एक निर्णय झाला. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी मला एक सल्ला दिला. आता मला मोठ्यांच्या म्हणण्याचा मान ठेवायचाच होता. मला संयम पाळावा लागेल.

मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची तुमची इच्छा कधीही खोटी ठरणार नाही. संयम पाळा. हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २२४ पैकी १३५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सिद्धारमैय्या हे मुख्यमंत्री तर डी.के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री बनले होते.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस