शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत सशर्त प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 03:43 IST

कृषी कायद्याविराेधात आंदाेलन; चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात, महाराष्ट्रातून शेतकरी दाखल

    लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविराेधात करणाऱ्या हजाराे शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यासाठी दिल्ली पाेलिसांनी सशर्त परवानगी दिली. शेतकरी नेत्यांसाेबत प्रदीर्घ चर्चेनंतर बुरारी भागातील मैदानात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यासाठी परवानगी देण्यात आली. चिघळलेली परिस्थिती त्यानंतर नियंत्रणात आली. तरीही तणाव कायम हाेता. पाेलीस संरक्षणात शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात आला.

कृषी कायद्याविराेधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलाे’ची हाक दिली हाेती. पंजाब आणि हरयाणातून माेठ्या संख्येने शेतकरी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी धडकले. त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर परिस्थिती चिघळली. सकाळपासून अनेक तास दिल्ली पाेलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू हाेता. हरयाणा सीमेवर विविध ठिकाणी ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये बसून हजाराे शेतकरी धडकले हाेते. त्यांनी बॅरिकेड्स माेडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले. शेतकऱ्यांना राेखण्यासाठी माेठ्या प्रमाणात पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. ड्राेनच्या माध्यमातूनही आंदाेलनावर नजर ठेवण्यात येत हाेती. अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

‘आप’ने परवानगी नाकारलीदिल्लीतील ९ मैदानांवर तात्पुरते तुरुंगा उभारून ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तिथे ठेवण्यासाठी दिल्ली पाेलिसांनी ‘आप’सरकारकडे परवानगी मागितली हाेती. परंतु, ती नाकारण्यात आली.

राहुल गांधींचे ट्वीटकाॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मी शेतकऱ्यांसाेबत’ असे ट्वीट करुन लिहिले की, माेदी सरकारला शेतकरीविराेधी काळे कायदे मागे घ्यावेच लागतील.

निरंकारी मैदानाचा पर्यायकाेराेनाचे कारण देउन शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात आला हाेता. त्यावरून शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. हरयाणा, पंजाब, राजस्थानसह सहा राज्यातील शेतकरी आंदाेलन करण्यासाठी निघाले हाेते. त्यांना आता बुरारी भागातील निरंकारी मैदानात परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी