अहमदाबाद : पाटीदार पटेल समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते हार्दिक पटेल आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध अहमदाबाद गुन्हे शाखेने सोमवारी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात राजद्रोहाच्या दुसऱ्या गुन्ह्याबद्दल २७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर राजद्रोहासह सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपही आहे. सध्या कारागृहात असलेले हार्दिक पटेल हे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक आहेत.एकूण सहापैकी अल्पेश कथिरिया तसेच अमरीश ऊर्फ अमूल पटेल या दोन आरोपींना फरार घोषित करण्यात आले असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राहुल पटेल यांनी पत्रकारांना सांगितले. २१ आॅक्टोबरपासून हार्दिक यांच्यासह चिराग पटेल, दिनेश पटेल, केतन पटेल हे कारागृहात बंद आहेत. (वृत्तसंस्था)
हार्दिक पटेलविरुद्ध आरोपपत्र दाखल
By admin | Updated: January 19, 2016 03:02 IST